महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट, कसं सावरायचं?; शरद पवार यांच्या 5 सूचना काय?

अलिकडे सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जात आहे. जे भाजपच्या विचाराला पाठिंबा देत नाहीत. त्यांना आत टाकलं जातं. ईडी आणि इतर यंत्रणेच्या माध्यमातून हे केलं जात आहे. त्यामुळे काही लोक सोडून जात आहेत, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट, कसं सावरायचं?; शरद पवार यांच्या 5 सूचना काय?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 10:53 AM

कोल्हापूर | 26 ऑगस्ट 2023 : राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे काही भागात पिके करपून गेली आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. राज्यावर दुष्काळाचं संकट घोंघावत असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या प्रचंड अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारला पाच सूचना केल्या आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठीच्या या सूचना असून पवारांच्या या सूचना राज्य सरकार मान्य करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील जलाशयाचा साठा कमी झाला आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. पण पिकांना पाणी मिळत नाहीये. काही ठिकाणी दुबारची स्थिती आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या पण पीक जळलं. हे संकट आहे. जेव्हा संकटाची चाहूल दिसते तेव्हा काही गोष्टी कराव्या लागतात, असं शरद पवार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांच्या सूचना

संकटाच्या परिस्थितीत लोकांना जगवलं पाहिजे. त्यांना कामं दिलं पाहिजे. पशूधन वाचवलं पाहिजे. पशूधनासाठी चारा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना गायी, म्हशी पुरवल्या पाहिजे. त्यानंतर पिण्याचं पाणी पुरवलं पाहिजे. माणगाव, खटाव आदी भागासह सात आठ जिल्ह्यात टँकरने पाणी येत आहे. येथील ग्रामस्थ टँकरची संख्या वाढवा म्हणत आहेत. सोलापुरात चार दिवसाने, काही ठिकाणी सहा दिवसाने पाणी येतं. पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांकडून जी वसुली केली जाते त्याला माफी दिली पाहिजे. कर्जातून सूट दिली पाहिजे. कर्जाचे दीर्घ हप्ते केले पाहिजे. हे सर्व करायला हवं. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आतापासून कामाला लागलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

त्यांना इतिहास माहीत नसेल तर…

यावेळी त्यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना नाव न घेता फटकारलं. मी स्वबळावरही मुख्यमंत्री झालो होतो. मी तीनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. पहिल्यांदा पुलोद स्थापन करून झालो. दुसऱ्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो. माझ्याच नेतृत्वात निवडणूक झाली. ती जिंकली. बहुमत आलं. आणि मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे यापूर्वीचा राज्याचा इतिहास कुणाला माहीत नसेल तर त्यावर काय भाष्य करायचं? अशा शब्दात त्यांनी दिलीप वळसे यांना फटकारलं.

सत्तेचा गैरवापर

राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक सहकारी आहेत. त्यांच्याबाबत मी काल बोललो. आम्ही का राष्ट्रवादीतून बाहेर पडलो हे त्यांनी सांगितलं आहे. का केलं हे सांगितलं याचा अर्थ काय? याचा अर्थ हे करण्यासाठी त्यांना परिस्थितीने भाग पाडलं. आता ती परिस्थिती कोणती? सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणा आहेत. या सर्वांचा गैरवापर केला जात आहे.

विरोधकांना तुरुंगात टाकलं जात आहे. कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं होतं. जे भाजपच्या चौकटीत बसत नाहीत. जे भाजपच्या विचाराला पाठिंबा देत नाहीत. त्यांना आत टाकलं जातं. तुम्ही पाठिंबा द्या नाही तर आत जा हे सूत्र अवलंबलं जात आहे. अलिकडे सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जात आहे. ईडी आणि इतर यंत्रणेच्या माध्यमातून केला जात आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.