पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीनंतर अंमली पदार्थांचे रॅकेट, ड्रग्सचा सर्वात मोठा साठा जप्त

| Updated on: Aug 03, 2023 | 7:57 AM

Pune Crime News : पुणे शहरात अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट कार्यरत होते. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी उच्चभ्रू परिसरात कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे.

पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीनंतर अंमली पदार्थांचे रॅकेट, ड्रग्सचा सर्वात मोठा साठा जप्त
drug
Follow us on

पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर गुन्हेगारी कमी होत नाही. पोलिसांनी मकोकासारखी कारवाई काही गुन्हेगारांवर केली आहे. कोम्बिंग ऑपरेशन राबवून अनेक गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. स्वत: पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर अधूनमधून कोयता गँग सक्रीय असल्याचे दिसत आहेत. गुन्हेगारीसोबत आता अंमल पदार्थांचे रॅकेट पुणे शहरात कार्यरत होते की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे शहरातील उच्चभ्रू परिसर अन् नामांकीत महाविद्यालय असलेल्या भागांतून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले आहेत.

कुठे झाली कारवाई

पुणे शहरातील उच्चभ्रू भागातून तब्बल 1 कोटी रुपयांचे अफिम जप्त केले गेले आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील लोहगाव भागात ही कारवाई केली आहे. राजस्थानच्या 32 वर्षीय व्यक्तीकडून 1 कोटी 10 लाख रुपयांचे अफिम जप्त केले आहे. राहुलकुमार भुरालालजी साहु असे अटक केलेल्या अरोपीचे नाव आहे.

पोलिसांना कशी मिळाली माहिती

गस्तीवर असलेल्या पोलिसांना राहुलकुमार साहू यांच्यासंदर्भात माहिती मिळाली. पोलिसांच्या खबऱ्याने त्याच्यासंदर्भात माहिती दिली. एक व्यक्ती लोहगाव भागात असलेल्या पोरवाल रोड येथे एका सोसायटीसमोर आला आहे, त्याच्याकडे अंमली पदार्थ आहे, असे पोलिसांना सांगितले गेले. यावरून पोलिसांनी कारवाई सुरु केली. पोलीस साहू याच्यापर्यंत पोहचले. त्याची चौकशी करत असताना त्याच्या जवळ 5 किलो 519 किलोग्रम एवढा अफिम आढळून आले. त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक महाविद्यालयांचा हा परिसर

लोहगाव हा भाग पुण्यातील एक उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. अनेक प्रसिद्ध आणि नामांकित महाविद्यालय या भागात आहेत. यामुळे युवकांना अंमलपदार्थांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न असल्याचे यामधून दिसून आले. नेमका हे अंमली पदार्थ साहू कोणाला विकणार होता याची माहिती चौकशीनंतर समोर येणार आहे. यामुळे अंमलीपदार्थांचे मोठे रॅकेट पुणे शहरात उद्धवस्त होणार आहे.