Pune Crime : ‘त्या’ दोन संशयितांची पोलीस कोठडीत रवानगी, चौकशीत धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

| Updated on: Jul 19, 2023 | 3:51 PM

पुणे पोलीस आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत काल रात्री दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. या दोन्ही आरोपींना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Pune Crime : त्या दोन संशयितांची पोलीस कोठडीत रवानगी, चौकशीत धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
व्यावसायिक आत्महत्या प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे / 19 जुलै 2023 : पुण्यातून काल रात्री ताब्यात घेतलेल्या दोन संशयीत दहशतवाद्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना 25 जुलै पर्यंत कोठडी सुनावली. मोहमद ईनुस साखी आणि इम्रान खान अशी दोघांची नावे आहेत. दोघांवर देशविरोधी कारवाई केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दोन्ही आरोपींकडे अनेक संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत. पुणे पोलीस आणि ATS ने संयुक्त कारवाई करत दोघांना कोथरुड येथून काल रात्री अटक केली होती. पोलीस चौकशीत आरोपींकडून अनेक धक्कदायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

दोन्ही आरोपींवर पाच लाखांचे बक्षीस होते

पुणे पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाने दिवसभर या दोघांकडे चौकशी केल्यानंतर ते NIA कडून फरार असलेले दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांच्याकडून जप्त केलेला मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी सुरू केली आहे. तर इतर तपास यंत्रणा देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. राजस्थान चित्तोडगड याठिकाणी NIA ने एक कारवाई केली होती. त्यावेळी काही स्फोटक पकडले गेले होते. त्या गुन्ह्यात हे दोघे फरार आहेत. NIA कडून या आरोपींवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

आरोपींना काल रात्री अटक केल्यानंतर आज दुपारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपींची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयात पोलिसांकडून आरोपींची पोलीस कोठडी मागणी करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपींना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आता पोलीस चौकशीत काय काय खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपींना जाणीवपूर्वक गोवल्याचा दावा

आरोपींचा वतीने यशपाल पुरोहित आणि सौरभ मोरे यांनी बाजू मांडली. आरोपींना यात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात एक गुन्हा नोंद आहे, याचा अर्थ या गुन्ह्यात इतकं गांभीर्य असेलच असे नाही. तसेच त्यांच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींची जप्ती झालेली आहे. यामुळे आरोपींच्या पोलीस चौकशीची आवश्यकता नसल्याचा दावा आरोपींच्या वकिलाने केला आहे.