Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांचे देव पाण्यात, एलॉन मस्क यांच्यासह गौतम अदानी यांना लक्ष्मी दर्शन

Mukesh Ambani : जगभरातील श्रीमंतांच्या यादीत सोमवारी मोठा उलटफेर झाला. गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा टॉप 20 एंट्री घेतली. एलॉन मस्कने तर एका दिवसांच्या कमाईत रेकॉर्ड केला. मुकेश अंबानी यांना मात्र जोरदार फटका बसला.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांचे देव पाण्यात, एलॉन मस्क यांच्यासह गौतम अदानी यांना लक्ष्मी दर्शन
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 8:46 AM

नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : सोमवारी श्रीमंतांच्या यादीत (Billionaire List) मोठा उलटफेर झाला. श्रावणातील पहिल्या सोमवारी रिलायन्सला मोठा फटका बसला. तर गौतम अदानी आणि जगतील अब्जाधीश एलॉन मस्क यांना श्रावणी सोमवार पावला. जिओ फायनेन्शिअलकडून (Jio Financial) मोठ्या अपेक्षा असताना रिलायन्सचे गिअर उलटे फिरले. पहिल्याच दिवशी हा शेअर सूचीबद्ध झाला. नवीन कंपनीची लिस्टिंग झाली पण परिणाम विपरीत मिळाले. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या एकूण संपत्तीत मोठी घट झाली. तर गौतम अदानी (Gautam Adani) यांनी चीन आणि अमेरिकेतील काही अब्जाधीशांना धोबी पछाड दिली. जगातील टॉप 20 सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांनी प्रवेश केला. बाजारात अदानींपेक्षा अंबानीचा घोडा जोरदार धावेल असा अंदाज होता. पण सर्वच फासे उलटे पडले. सोमवारी बाजारातील या घडामोडींमुळे गुंतवणूकदार अधिक सावध झाले.

मुकेश अंबानी यांना फटका

सोमवारी जिओ फायनेन्शिअल लिमिटेडचा शेअर 5 टक्क्यांनी घसरला. तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1.50 टक्क्यांची घसरण दिसली. त्याचा परिणाम आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवर दिसून आला. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार सोमवारी त्यांच्या संपत्तीत 1.8 अब्ज डॉलर म्हणजे 15 हजार कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 94.6 अब्ज डॉलरवर आली. मार्क झुकरबर्ग यांच्यानंतर ते 11 व्या स्थानी आहेत. वर्षभरात अंबानी यांच्या संपत्तीत एकूण 7.46 अब्ज डॉलरची वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

गौतम अदानी यांची टॉप 20 मध्ये एंट्री

गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. त्यांनी लांब उडी मारली. अदानी यांची जगातील टॉप 20 मध्ये एंट्री झाली. गौतम अदानी यांनी अमेरिकन आणि चीनच्या अब्जाधीशांना या यादीत मात दिली. ते आता या यादीत 18 व्या क्रमांकावर आले आहेत. आकड्यांनुसार, त्यांच्या संपत्तीत जवळपास 18 कोटींची रुपयांची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती 65.9 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. पण या वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीत 54.6 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली. सध्याच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक घट झाली आहे.

एलॉन मस्क यांची रॉकेट भरारी

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिक एलॉन मस्क यांच्या संपत्तीत या वर्षात सर्वाधिक वाढ झाली. त्यांना मध्यंतरी फटका बसला होता. पण आता त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. सोमवारी टेस्लाच्या शेअरमध्ये 7.33 टक्के तेजी दिसून आली. त्यांच्या संपत्तीत 11.3 अब्ड डॉलर म्हणजे 93 हजार कोटी रुपयांची वाढ दिसून आली. त्यांची संपत्ती आता 216 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. गेल्या एका महिन्यात त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण दिसून आली. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी 270 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला होता. टेस्लाचे शेअर गडगडल्याने त्यांना फटका बसला होता. त्यांच्या संपत्ती यंदा 79.2 अब्ज डॉलरची वाढ दिसून आली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.