sharad pawar ajit pawar meet | गुप्तभेटी मागचं कारण | tv9 मराठीच्या कॅमेऱ्यातून ना सुटले अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील
अजित पवार आणि शरद पवार एवढंच नाही तर जयंत पाटील हे देखील टीव्ही ९ च्या कॅमऱ्यातून सुटू शकले नाहीत. या नेत्यांची भेट ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, भेट घेतल्यानंतर कोण कसे बाहेर पडले हे देखील यात कैद झाले आहे. उद्योजक अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील घरी झालेल्या भेटी मागचं कारण देखील समोर येत आहे.
पुणे | 12 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात गुप्त भेट झाली आहे, उद्योजक अतुल चोरडीया यांच्या अलिशान घरी ही भेट झाली आहे. या दरम्यान मीडियाला चुकवण्यासाठी अजित पवार यांनी २ गाड्या बदलवल्या पण अखेर एका गाडीत अजित पवार हे मीडियाला दिसून आले आहेत. Tv9 मराठीच्या कॅमेऱ्यात अजित पवार हे दिसून आले आहेत. या भेटीची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात किमान ३० मिनिटे चर्चा झाली आहे. अजित पवार यांची गाडी यांच्या घरी ३० मिनिटे होती. उद्योजक अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्क या निवासस्थानी ही चर्चा झाली आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात यापूर्वीही मुंबईत २ वेळेस भेट झाली होती, पण ही भेट उघड-उघड होती, यात शरद पवार यांनी बोलणे टाळले होते, पण पुण्यातील आजची ही भेट गुप्त असल्याचं दिसून आलं आहे. कारण अजित पवार हे मीडियाला चुकवण्यासाठी एका गाडीत खाली वाकून बसल्याचं दिसून आले. एवढंच नाही राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे देखील अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर दिसून आले आहेत.या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. उघड उघड भेटीत काहीही न बोलणारे शरद पवार अजित पवार यांच्याशी गुप्तभेट का घेत आहेत, याविषयी चर्चेला उधाण.
पुण्यात आज राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये गुप्त भेट झाली आहे, ही भेट गुप्त असली तरी टीव्ही ९ मराठीने ही भेट महाराष्ट्रासमोर आणली आहे. TV9 मराठीच्या कॅमेऱ्यातून ना सुटले अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील. कारण ही भेट मीडियाला अर्थातच महाराष्ट्राला समजू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती, पण अखेर टीव्ही ९ मराठीच्या कॅमेऱ्यात ही भेट कैद झाल्याने, ही गुप्त भेट महाराष्ट्रासमोर उघड झाली आहे.
या गुप्तभेटीमागे नेमकं काय कारण आहे, जेव्हा अजित पवार हे भाजपासोबत गेले, यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा आला आहे.अशा वेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात नेमकी कोणत्या कारणावरुन भेट होत आहे, तर अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला असल्याचं बोललं जात आहे, यानंतर ही भेट झाली असल्याची चर्चा आहे.