रतन टाटा यांच्यासोबत सावलीसारखा असणारा पुणेकर शांतनू नायडू आहे कोण?

Shantanu naidu And Ratan-tatas : रतन टाटा यांच्यासोबत एक मुलगा नेहमी दिसतो. अगदी रतन टाटा यांची सावलीच त्याला म्हणता येईल. कोण आहे हा मुलगा अन् त्याचे रतन टाटा यांच्यांशी काय आहे नाते? पुणे शहरात जन्म झालेल्या या युवकाची वाटचाल पाहू या...

रतन टाटा यांच्यासोबत सावलीसारखा असणारा पुणेकर शांतनू नायडू आहे कोण?
Shantanu naidu And Ratan tataImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 12:08 PM

पुणे : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा. आपल्या उद्योगाबरोबर सामजिक कार्यामुळे प्रसिद्ध आहे. टाटा ग्रुपचा वाटा अनेक सामाजिक क्षेत्रातही आहे. रतन टाटा यांच्यासोबत एक मुलगा अनेकदा दिसतो. अगदी रतन टाटा यांचा सावलीसारखा तो सोबत असतो. मुळचा पुणेकर असणारा या मुलाचे नाव आहे शांतनू नायडू. वय वर्ष फक्त ३० अन् रतन टाटा याचा वैयक्तीक सहायक. शांतनू हा फक्त रतन टाटा यांचा कर्मचारी नाही तर त्यांचा व्यवसाय अन् गुंतवणूकही पाहतो. रतन टाटाही त्याला आपला मुलगा समजतात.

कोण आहे शांतनू

शांतनू नायडू हा अभियंता आहे. तो लेखकसुद्धा आहे. शांतनू याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याचा जन्म १९९३ मध्ये पुणे येथे झाला. टाटा समूहात काम करणारी तो पाचव्या पिढीचा प्रतिनिधी आहे. त्याच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी टाटा ग्रुपमध्ये काम केले आहे.

कशी झाली रतन टाटा यांच्यांशी ओळख

शांतनू याने अमेरिकेतून पदवी घेऊन २०१८ मध्ये परत भारत गाठले. एकदा शांतनू नायडू आपल्या एनजीओच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांसाठी काम करत होता. त्याच्याकडे निधीची कमतरता होती. मग त्याने रतन टाटा यांना पत्र लिहिले. त्याचे पत्र वाचल्यावर रतन टाटा यांनी त्याला भेटण्याचा निर्णय घेतला. मग रतन टाटा त्याच्या बोलण्याने चांगलेच प्रभावित झालेत. त्यांनी शांतनूला टाटा ट्रस्टच्या चेअरमन ऑफिसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून रुजू करुन घेतले.

हे सुद्धा वाचा

शांतनू यांची आहे कंपनी

शांतनू नायडू याची गुडफेलोज ही कंपनी आहे. या कंपनीचा संस्थापक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळवून देण्यासाठी ही कंपनी कार्यरत असते. या कंपनीचे मूल्य पाच कोटीपेक्षा जास्त आहे. यामध्ये रतन टाटा यांनीही गुंतवणूक केली आहे.

शांतून याचा पगार किती

शांतनू नायडू याचा महिन्याचा पगार सात लाख रुपये आहे. त्याची एकूण संपत्ती ६ कोटी आहे. २०१८ पासून तो रतन टाटा यांच्यासोबत काम करत आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.