पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून जाणार सेमी हायस्पीड ट्रेन? पाहा कसा असणार मार्ग

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या औद्योगिक क्षेत्रांना नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सेमी हायस्पीडचा हा प्रकल्प ब्रॉडगेजवर असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.

पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून जाणार सेमी हायस्पीड ट्रेन? पाहा कसा असणार मार्ग
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 2:28 PM

पुणे : नाशिकहून थेट पुण्याला (Nashik- Pune) सेमी हायस्पीड ट्रेनने (Pune Nashik high Speed Train) लवकरच जाता येणार आहे. या रेल्वे प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्याला प्राथमिक मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्प सुरु होणार आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या औद्योगिक क्षेत्रांना नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सेमी हायस्पीडचा हा प्रकल्प ब्रॉडगेजवर असावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (Maharashtra Rail Infrastructure Development Corporation) म्हणजेच महारेलकडून हा प्रकल्प करण्यात येणार आहे.

वेग ताशी 200 किलोमीटर

हे सुद्धा वाचा

पुणे-नाशिक दरम्यान सरळ रेल्वे मार्ग नाही. यामुळे पुण्याहून नाशिकला रेल्वे मार्गाने जाण्यासाठी कल्याण व कल्याणवरुन पुन्हा दुसऱ्या ट्रेनने नाशिक गाठावे लागते. यात सुमारे पाच ते सहा तास जातात. परंतु आता पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्ग होणार आहे. 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असणार आहे. नाशिक, नगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्यांतून हा प्रकल्प जाणार आहे. हा प्रकल्प ब्रॉडगेजवर चालवल्यास शेतकरी आणि उद्योगांना मोठा फायदा होईल.

कसा आहे प्रकल्प?

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत पुर्ण करता येणार आहे. ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे. दरम्यान, या रेल्वेच्या कामासाठी जमीन देण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

  •  235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
  • रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
  •  रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग
  • पुढे हा वेग 250 किलोमीटरपर्यंत वाढवणार
  •  पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
  • वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प
  • पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
  • 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित

कसा होणार खर्च?

  •  प्रवासी आणि मालवाहतूक चालणार
  • रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह
  •  स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य
  • प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
  • प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था
  • 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा
  •  कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार
  •  विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.