Mumbai-Pune Express : पुणे, मुंबई एक्स्प्रेस होणार स्मार्ट, नवीन प्रणालीमुळे असा होणार बदल

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते. तसेच अपघात होत असतात. यामुळे महामार्गावर ITMS प्रणाली बसवण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे महामार्ग स्मार्ट होणार आहे.

Mumbai-Pune Express : पुणे, मुंबई एक्स्प्रेस होणार स्मार्ट, नवीन प्रणालीमुळे असा होणार बदल
pune mumbai expresswayImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 8:46 AM

पुणे | 18 ऑगस्ट 2023 : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. हे अपघात टाळण्यासाठी मोठी योजना हाती घेतली आहे. महामार्गावरील अनेक अपघात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होतात. तसेच यामुळेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या सर्व प्रकारावर मार्ग काढण्यासाठी सुमारे १६० कोटी रुपये खर्च करुन इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली (ITMS) उभारण्यात येत आहे. या प्रणालीमुळे अपघात टळणार आहे अन् लाख मोलांचे जीव वाचणार आहे. तसेच बेशिस्त वाहनधारकांना नियम मोडणे चांगलेच महागात पडणार आहे.

काय आहे तंत्रज्ञान

पुणे, मुंबई एक्स्प्रेसवर इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून ही प्रणाली कार्यन्वीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र स्टेट रोड ट्रन्सपोर्ट कॉरपोरेशन (MSRDC) कडून ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. महामार्गावर 430 कॅमेरे असणार आहे. हे कॅमेरे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे.

कंट्रोल रुम तयार

महामार्गावर बसवण्यात येणारे कॅमेरे सुमारे 17 प्रकारचे वाहतुकीचे उल्लंघन शोधू शकतात. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मॉडेल अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. त्यासाठी कुसगाव येथे एक कमांड अँड कंट्रोल सेंटर (CCC) देखील तयार केले गेले आहे. या ठिकाणी बसून महामार्ग पोलीस अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहभागाने चोवीस तास लक्ष ठेवणार आहे.

हे सुद्धा वाचा

नेमके काय असणार

मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवणार आहे. महामार्गावर एखादे वाहन वेग मर्यादा ओलांडल्यास ‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ने तपासणी होईल. ‘लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’मधून लेन मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

असे असतील नियम

डावीकडून जाणारी पहिली लेन अवजड वाहनांसाठी आहे. त्यांना ८० किलोमीटरची वेग मर्यादा असणार आहे.दुसरी लेन चारचाकी वाहनांची असणार आहे. त्याची वेगमर्यादा १०० किलोमीटर असणार आहे. तर तिसरी लेन ओव्हरटेकची आहे. या लेनमधून ओव्हरटेक करुन पुन्हा आपल्या निर्धारित लेनमधूनच प्रवास करायचा आहे. हे नियम मोडल्यास कारवाई अटळ असणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.