NCP : पंतप्रधानांच्या घरासमोर सर्व धर्मांच्या प्रार्थना पठणाची परवानगी द्या; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची गृहमंत्री शाह यांच्याकडे मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या घरासमोर प्रत्येक धर्माच्या प्रार्थना करायला परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हाध्यक्षाने गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे केली आहे.

NCP : पंतप्रधानांच्या घरासमोर सर्व धर्मांच्या प्रार्थना पठणाची परवानगी द्या; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची गृहमंत्री शाह यांच्याकडे मागणी
फहमिदा हसन खान
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 12:21 PM

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या घरासमोर प्रत्येक धर्माच्या प्रार्थना करायला परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हाध्यक्षाने गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे केली आहे. एकीकडे हनुमान चालीसाच्या पठणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची तुरुंगवारी सुरू आहे. त्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उठलाय. त्या वादात या मागणीने भर पडणार आहे. सध्या येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. काहीही करून मुंबई जिंकायची, असा निर्धार भाजप आणि शिवसेनेने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपने मुंबईत पोलखोल अभियान सुरू केले आहे. तर शिवसेनेच्या वतीने त्यांना रोज खासदार संजय राऊत जोरदार प्रत्युत्तर देताना दिसतायत. आता महाविकास आघाडीतील एकेक पक्षही शिवसेनेच्या बाजून उभा टाकताना दिसतोय. ही मागणी त्याचेच प्रतीक आहे.

कोण केली मागणी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष फहमिदा हसन खान यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून ही मागणी केलीय. त्या म्हणतात, मी फहमीदा हसन खान. कांदिवली मुंबईतून आपल्याकडे अशी मागणी करते की, आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर नमाज, हनुमान चालिसा, नवकार मंत्र, गुरू ग्रंथ आणि नोविनो म्हणण्याची परवानगी द्यावी. त्यासाठी दिवस आणि वेळही सांगावी.

तर असा होईल फायदा

मी गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर प्रत्येक धर्माच्या प्रार्थना करण्यासाठी परवानगी मागितली आहे. महागाई, बेरोजगारी, उपासमार कमी करण्यासाठी हिंदुत्व, जैन आणि इतर धर्म जर देशाच्या फायद्याचे ठरत असतील, तर मला तशी प्रार्थना करायला आवडेल. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्यावरून सुरू झालेले वादंग पेटले आहे. त्यात आता ही दुसरी मागणी आली आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.