Uddhav Thackeray | ‘कुणाच्याही मुलावर आरोप कर, कुणाच्या पत्नीवर आरोप कर, कुणाच्याही घरामध्ये पोलीस घुसवत आहात’, उद्धव ठाकरे सडेतोड बरसले

"तुम्ही कुणाच्याही घरामध्ये पोलीस घुसवत आहात. अनिल देशमुख यांना आत टाकलं होतं. अनिल देशमुख यांच्या नातीची तुम्ही चौकशी केलीत. पाच-सहा वर्षाची चिमुकली. तिची चौकशी केली", असं उद्धव ठाकरे मालेगावातील सभेत म्हणाले.

Uddhav Thackeray | 'कुणाच्याही मुलावर आरोप कर, कुणाच्या पत्नीवर आरोप कर, कुणाच्याही घरामध्ये पोलीस घुसवत आहात', उद्धव ठाकरे सडेतोड बरसले
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 9:07 PM

मालेगाव : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. भाजप नेत्यांकडून विरोधकांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर संबंधित नेत्यांच्या घरी जाऊन केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केल्याच्या अनेक घटना देशभरात घडल्या. या घडामोडींवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला सूचक इशारा दिला. “आमच्या कुटुंबियांचा बदनामीचा प्रकार तुम्ही थांबवला नाही तर तुमच्या कुटुंबियांचे लागेबांधे आम्ही बाहेर काढू”, असा सूचक इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

“एकनाथ शिंदे गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा कर्तृत्व शुन्य आहे. कारण अजूनही माझ्या वडिलांचं नाव तुम्हाला वापरावं लागतं हा तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला त्या राजकारणारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवर वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्यासमोर फिरणार आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘दिसला भ्रष्टाचारी की घेतला पक्षात’

“मी लढाई समजू शकतो. भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई कोण करणार तर भाजप? भाजपने लक्षात ठेवावं, कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत यादी काढली तर हातभर पेक्षा जास्त मोठी होईल, संपूर्णपणे तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना पक्षात घेतलेलं आहे. काल-परवा त्यांचाच एक आमदार विधान परिषदेत बोललेला आहे की, आमच्याकडे निरमा पावडर आहे. जे आमच्याकडे भ्रष्ट लोकं येतात त्यांना या निरमा पावडरने धुतलं की ते स्वच्छ होतात. काय मोठ्या मनाची माणसं आहेत बघा. भ्रष्टाचारी शिल्लकच ठेवायचे नाहीत. दिसला भ्रष्टाचारी की घेतला पक्षात. पण सगळी भ्रष्ट माणसं तुमच्या पक्षात घेतल्यानंतर एक काम मात्र नक्की करा. पहिले तुमचं नाव बदला जे भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता भ्रष्ट नाही. भ्रष्ट झालेला पक्ष असं त्याचं नाव ठेवा”, असा सल्ला त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

‘कुणाच्याही मुलावर आरोप कर, कुणाच्या पत्नीवर आरोप कर’

“भाजपमध्ये जे चांगले माणसं आहेत त्यांना विचारतो की, तुमच्या आजूबाजूला जे भ्रष्टाचारी बसल्यानंतर त्या भ्रष्टाचारांच्या मेळ्यात तुम्ही सभ्य माणसं कसे जाऊ शकतात. पण दुसऱ्याच्या कुटुंबावर बेफान आरोप करतात. चारित्र्य हनन करतात. कुणाच्याही मुलावर आरोप कर, कुणाच्या पत्नीवर आरोप कर, पण यांच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतर भारताचा अपमान. तुमचा नेता म्हणजे भारत नाही. एवढा शुद्र माझा भारत नाहीय. मोदींवर टीका केल्यानंतर भारताचा अपमान. मोदी म्हणजे भारत मान्य आहे का? यांच्यासाठी आपल्या क्रांतीकारकांनी रक्त सांडलं होतं? माझा देश मोठा आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘…तर तुमच्या सुद्धा कुटुंबियांचे लागेबांधे आम्हाला काढावे लागतील’

“तुमच्या कुटुंबियांवर बोलल्यानंतर ताबडतोबीने पोलीस कारवाई करतात. घराघरात पोलीस घुसतात. माणूस परराज्यात गेला असेल तर तिकडून पकडून आणता. तुमचं कुटुंब जसं तुम्हाला प्यारं आहे तसं प्रत्येकाचं कुटुंब आपापल्याला प्यारं आहे. आमच्या कुटुंबियांचा बदनामीचा प्रकार तुम्ही थांबवला नाही तर तुमच्या सुद्धा कुटुंबियांचे लागेबांधे आम्हाला काढावे लागतील”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. “आतासु्द्धा आम्ही काढत नाहीत. कारण आमचं हिंदुत्व. आमच्यावर संस्कार आहेत. आम्ही तुमच्या घरामध्ये महिला, मुलं असतील. पण कुणी कुटुंब व्यवस्था मानत नसेल तर प्रश्नच संपला”, अशी टीका त्यांनी केली.

“दुसऱ्याच्या कुटुंबावर आरोप करायचे, घरी धाडी टाकायच्या. हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? शिवसेना काँग्रससोबत गेली म्हणून हिंदुत्व सोडलं. वाटतं तुम्हाला? एक तरी अशी घटना दाखवा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदुत्वापासून लांब गेलो. आम्ही हिंदुत्व म्हणजे मर्यादा पाळतोय हे आमचं हिंदुत्व आहे. राष्ट्रीयत्व हे आमचं हिंदुत्व आहे. शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. माझे वडील, आजोबा जे सांगत आहेत तेच मी बोलतोय”, असं ठाकरे म्हणाले.

‘लालू प्रसाद यादव यांची सून गरोदर, बेशुद्ध पडेपर्यंत तिची चौकशी’

“तुम्ही कुणाच्याही घरामध्ये पोलीस घुसवत आहात. अनिल देशमुख यांना आत टाकलं होतं. अनिल देशमुख यांच्या नातीची तुम्ही चौकशी केलीत. पाच-सहा वर्षाची चिमुकली. तिची चौकशी केली. लालू प्रसाद यादव यांची सून गरोदर आहे. ती बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही तिची चौकशी केली. एवढं निर्घृण आणि विकृत हिंदुत्व असू शकत नाही. हे आमचं हिंदुत्व नाहीय. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की, परस्त्री मातेसमान आहे. पण तुम्ही घरात घुसताय. महिला गर्भवती असली तरी तिला चौकशीसाठी ताटकळत ठेवत आहात. ती बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करत आहात. सहा वर्षाच्या मुलीची चौकशी करत आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.