Agriculture award : राज्यातल्या 198 शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार जाहीर; 2 मे रोजी नाशिकमध्ये मुख्यमंत्री, राज्यपालांच्या हस्ते गौरव

राज्यातील कृषी, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्‍पादन, उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या 2 मे रोजी नाशिक (Nashik) येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Agriculture award : राज्यातल्या 198 शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार जाहीर; 2 मे रोजी नाशिकमध्ये मुख्यमंत्री, राज्यपालांच्या हस्ते गौरव
दादा भुसे
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 10:02 AM

नाशिकः राज्यातील कृषी, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्‍पादन, उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या 2 मे रोजी नाशिक (Nashik) येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. भुसे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. तो कार्यक्रम आता 2 मे रोजी होणार आहे. कृषी, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन-उत्‍पन्‍न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी विस्‍तारामध्‍ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्‍यक्‍ती, संस्‍था, गट, अधिकारी-कर्मचाऱ्यांना कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

असा होणार सोहळा

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2 मे रोजी सकाळी 11 वाजता तीन वर्षांतील 198 पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्‍पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कृषी विभागाचे थेट प्रक्षेपण…

पुरस्‍कारार्थींना रोख रकमेसोबत स्‍मृतीचिन्‍ह,सन्‍मानपत्र व सपत्‍नीक/ पतीसह सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. सर्व पुरस्‍कारप्राप्‍त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्‍हणून कृषी विभागातील विविध योजनांमध्‍ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. कष्टातून आपल्या शेतीत प्रगती साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या या गौरव सोहळ्याचे थेट प्रसारण https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषी विभागाच्या युट्यूब चॅनेलवरुन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.

पुरस्कारांच्या संख्येत वाढ

सन 2020 पासून विविध कृषी पुरस्‍कार मार्गदर्शक सूचनांमध्‍ये बदल करण्‍यात आले असून, यामध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार संख्‍या 10 वरुन 8 करण्यात आली आहे. राज्याच्या सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी विभागनिहाय एक याप्रमाणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कारांची संख्‍या 25 वरुन 40 करण्यात आली असून जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार संख्‍या 5 वरुन 8 तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार 3 वरुन 8, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्‍कार 9 वरुन 8 करण्‍यात आली आहे. सन 2020 पासून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे युवा शेतकरी पुरस्‍कार देण्यात येणार असल्याचे सांगून पीकस्‍पर्धा रब्‍बीच्या तालुका, जिल्‍हा ,विभाग व राज्‍य पातळ्यांवरील बक्षीसांच्‍या रक्‍कमेमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

198 शेतकऱ्यांचा ‘या’ पुरस्कारांनी होणार सन्मान

– डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्‍न पुरस्कार – 4 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 75 हजार रुपये)

– वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार – 28 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 50 हजार रुपये)

– जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार – 9 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 50 हजार रुपये)

– कृषिभूषण (सेंद्रिय शेती) – 23 पुरस्‍कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)

– वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार – 9 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 30 हजार रुपये)

– उद्यानपंडीत पुरस्‍कार – 25 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 25 हजार रुपये)

– वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कार – सर्वसाधारण गट – 57 पुरस्‍कारार्थी, आदिवासी गट – 18 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 11 हजार रुपये)

– राज्‍यस्‍तरीय पीकस्‍पर्धा- खरीप भात – 9 पुरस्‍कारार्थी, खरीप सोयाबीन 9 पुरस्‍कारार्थी – प्रत्‍येकी प्रथम क्रमांक – 10 हजार रुपये, व्दितीय क्रमांक – 7 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक 5 हजार रुपये

– पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्‍न पुरस्‍कार – 7 पुरस्‍कारार्थी.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.