Maharashtra Politics | ठाकरे गटाला दिलासा, भाजपाला झटका, नगरमधील एक मोठा नेता घरवापसीच्या मार्गावर

Maharashtra Politics | भाजपामधील 'हा' नेता 23 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. ठाकरे गटाला कमकुवत करण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु आहे. राजकीय घडामोडीं दरम्यान ठाकरे गटासाठी एक दिलासा देणारी बातमी

Maharashtra Politics | ठाकरे गटाला दिलासा, भाजपाला झटका, नगरमधील एक मोठा नेता घरवापसीच्या मार्गावर
Uddhav ThackerayImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 3:54 PM

नगर : मागच्यावर्षी राज्यात सत्ता बदल झाला. शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन केलं. निवडणूक आयोगाने पक्षाच नाव शिंदे गटाला दिलं. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. राज्यात सत्तेवर असल्यामुळे शिंदे गटात सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. त्याचवेळी ठाकरे गटातून आऊटगोईंगही सुरु आहे. ठाकरे गटाला कमकुवत करण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु आहे.

या राजकीय घडामोडीं दरम्यान ठाकरे गटासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नगरमधील एक मोठा नेता पुन्हा ठाकरे गटात परणार आहे. यामागे लोकसभा निवडणुकीच राजकीय गणित आहे.

रामदास आठवलेंचा केला होता पराभव

भाऊसाहेब वाकचौरे यांची घरवापसी होणार आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटात परतणार आहेत. भाजपात असलेले वाकचौरे ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. 23 तारखेला ते ठाकरे गटात प्रवेश करतील. 2009 साली शिवसेनेच्या तिकीटावर भाऊसाहेब वाकचौरे निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता.

2024 लोकसभा निवडणूक लढवणार?

2014 साली वाकचौरे यांना काँग्रेसने उमदेवारी दिली. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता ते पुन्हा स्वगृही परतणार आहेत. 2024 साली ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानचं विश्वस्त

भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सध्या ते भाजपमध्ये आहेत. विशेष म्हणजे भाजप कोट्यातून साईबाबा संस्थानचं विश्वस्तपदही त्यांनी भूषवलं. 2019 मध्ये शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनाच तिकीट दिलं. त्यामुळे वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.