Gold Price Today: दिल गोल्डन, गोल्डन हो गया; भाव स्वस्त झाल्याने ग्राहक पुन्हा सोन्यावर फिदा!
रशिया-युक्रेन युद्धाची कमी झालेली धग आणि गुंतवणूकदारांनी इतरत्र वळवलेला मोर्चा पाहता पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी आणि स्थिर होताना दिसतायत. नाशिकमध्ये बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51600 रुपये नोंदवले गेले. देशाची राजधानी दिल्ली, मुंबई, पुण्यासह राज्यातल्या इतर शहरातही सोन्याचे भाव कमी झालेले दिसले.
नाशिकः रशिया-युक्रेन युद्धाची कमी झालेली धग आणि गुंतवणूकदारांनी इतरत्र वळवलेला मोर्चा पाहता पुन्हा एकदा सोन्याचे (Gold) दर कमी आणि स्थिर होताना दिसतायत. नाशिकमध्ये (Nashik) बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51600 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 49400 रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 68500 रुपये नोंदवले गेले. यावर तीन टक्के जीएसटी अतिरिक्त असेल, अशी माहिती द नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. अजून लगीनसराई सुरू झालेली नाही. गुढीपाडवाही लांब आहे. त्यामुळे तूर्तास बाजारात सोन्याला म्हणावी तशी मागणी नाही. येणाऱ्या काळात सराफातील गर्दी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या साधारणतः दोनशे ते पाचशे रुपयांच्या दरम्यान सोन्याच्या भावात चढ-उतार होत असल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात हे भाव पुन्हा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
काय आहेत महाराष्ट्रातले दर?
मुंबईत बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51670 रुपये नोंदवले गेले. कालच्या तुलनेत आजच्या भावात आज 430 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47350 रुपये नोंदवले गेले. कालच्या तुलनेत आजच्या भावात 400 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. पुण्यात बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51740 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47720 रुपये नोंदवले गेले. नागपूरमध्ये बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51720 रुपये नोंदवले गेले. कालच्या तुलनेत आजच्या भावात आज 430 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47400 रुपये नोंदवले गेले.
काय आहेत दिल्लीतील दर?
देशाची राजधानी नवी दिल्लीतही सोन्या आणि चांदीचे भाव स्वस्त झालेले दिसले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 51315 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47005 रुपये नोंदवले गेले. या दरात कालच्या तुलनेत आज 172 रुपयांची घट झाल्याचे दिसले. तर चांदीचे दर किलोमागे 67004 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर कालच्य तुलनेत आज 189 रुपयांनी घसरल्याचे दिसले.
24 कॅरेट सोन्याचे दर (10 ग्रॅममागे)
दिल्ली – 51315
मुंबई – 51670
पुणे – 51740
नाशिक – 51600
नागपूर – 51720
22 कॅरेट सोन्याचे दर (10 ग्रॅममागे)
दिल्ली – 47005
मुंबई – 47350
पुणे – 47720
नाशिक – 49400
नागपूर – 47400
इतर बातम्याः