Eid al-Fitr 2023 Date : 22 की 23 एप्रिल, भारतात कधी साजरी होणार ईद?

ईद हा मुस्लिम धर्मातला पवित्र सण माणला जातो. त्या निमीत्याने बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी ईदच्या 1 किंवा 2 दिवस आधी रात्रभर बाजार भरतात.

Eid al-Fitr 2023 Date : 22 की 23 एप्रिल, भारतात कधी साजरी होणार ईद?
ईदImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 6:00 PM

मुंबई :  जगभरात ईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 1 महिना रोजा पाळल्यानंतर ईद साजरी केली जाते. ईद हा मुस्लिम धर्मातला पवित्र सण माणला जातो. त्या निमीत्याने बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी ईदच्या 1 किंवा 2 दिवस आधी रात्रभर बाजार भरतात. तथापि, या वर्षी ईदसाठी (ईद-उल-फितर किंवा ईद-उल-अधा) (Eid al-Fitr 2023 Date) कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. 20 एप्रिलला म्हणजेच आज संध्याकाळी चंद्र दिसल्यानंतरच भारतात ईद कोणत्या दिवशी साजरी होणार हे निश्चित होईल. आज म्हणजेच 20 तारखेला सौदी अरेबिया आणि आखाती देशांमध्ये चंद्र दिसला तर 21 एप्रिल रोजी ईद साजरी केली जाईल.

जर अरब देशांमध्ये ईद 21 तारखेला साजरी केली गेली असेल तर भारतात ती 22 एप्रिलला म्हणजेच शनिवार किंवा रविवारी साजरी केली जाईल. खरं तर, भारतात ईद अरब देशांमध्ये ईदच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते, परंतु नेहमीच असे असणे आवश्यक नाही. चंद्र पाहिल्यानंतरच सर्व काही निश्चित होते.

रमजानची सुरुवात

यावर्षी 24 मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला. यावेळी उपवास म्हणजेच रोजे 29 किंवा 30 दिवसांचा असू शकतो. रमजानचा पवित्र महिना चंद्र पाहिल्यानंतरच सुरू होतो आणि या महिन्याच्या शेवटी चंद्र पाहूनच ईद साजरी केली जाते. यामुळेच ईदची कोणतीही निश्चित तारीख नाही. हे दरवर्षी चंद्राच्या उदयावरच ठरवले जाते.

हे सुद्धा वाचा

चंद्र रात्र काय आहे?

ईद-उल-फित्र, चंद्र रात्रीनंतर सकाळी साजरा केला जातो, हा जगभरातील मुस्लिमांकडून साजरा केला जाणारा एक प्रमुख धार्मिक सण आहे. रमजान महिन्यातील उपवास या दिवशी संपतो. या पवित्र महिन्यात, मुस्लिम समाजातील लोकं एक उपवास पाळतात ज्यामध्ये ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत खाण्यापिण्यापासून दूर राहतात. म्हणूनच ईद-उल-फित्रला “उपवास सोडण्याचा सण” असेही म्हटले जाते. शव्वाल हा इस्लामिक चंद्र कॅलेंडरमधील दहावा महिना आहे आणि या महिन्याचा पहिला दिवस जगभरात ईद-उल-फित्र म्हणून साजरा केला जातो.

ईद-उल-फित्रचे महत्त्व

ईद-उल-फित्र किंवा ईद हा मुस्लिम समाजाचा मुख्य सण आहे. याविषयी एक समजूत आहे की, या दिवशी पैगंबर हजरत मुहम्मद यांनी बद्रच्या युद्धात विजय मिळवला होता आणि या आनंदात दरवर्षी ईद साजरी केली जाते. इ.स. 624 मध्ये पहिल्यांदा ईद-उल-फित्र साजरी करण्यात आली असे म्हणतात. आनंद, शांती, सद्भावना आणि बंधुभाव वाढवण्यासाठी ईद सणाचे महत्त्व आहे. या दिवशी लोकं नवीन कपडे घालतात, नमाज वाचतात, मिठी मारतात, गोड शेवया खातात आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.