Viral News : 8 कोटी रुपयांची चोरी, पण पोलिसांनी फक्त 10 रूपयांमध्ये लावला आरोपीचा शोध, जाणून घ्या!

डिजीटल युगात लोकं घरात पैसे, दागिने ठेवणं टाळू लागले आहेत. आता चोरांनी त्यांचा मोर्चा थेट बँकेच्या पैशाकडे वळवला. चोरांनी 8 कोटी उडवले पण एका चुकीने सर्वकाही उघडकीस आलं.

Viral News : 8 कोटी रुपयांची चोरी, पण पोलिसांनी फक्त 10 रूपयांमध्ये लावला आरोपीचा शोध, जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 7:25 PM

Crime : तुम्ही याआधी अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतीस. घरफोडी, दुकान फोडून साहित्य लंपास अशा मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला जातो. आता डिजीटल युगात लोकं घरात पैसे, दागिने ठेवणं टाळू लागले आहेत. आता चोरांनी त्यांचा मोर्चा थेट बँकेच्या पैशाकडे वळवला आहे. अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये चोरांनी बँकेची कॅशव्हॅनच चोरली. तब्बल 8 कोटींची रक्कम त्यांनी पळवली मात्र एका चुकीने त्यांचा गेम झाला.

नेमकं काय आहे प्रकरण? 

10 जून रोजी रात्री 1.30 वाजता लुधियानामधील न्यू राजगुरु नगर येथील सीएमएस सिक्योसिटीजच्या एका कॅश व्हॅनची चोरी झाली होती. पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे या व्हॅनमध्ये 8 कोटी 49 लाख रुपये होते. पोलिसांना घटनास्थळापासून 20 किलोमीटर लांब मुल्लांपूर या गावात व्हॅन मिळाली. व्हॅनमध्ये हत्यार आणि दोन बंदुकाही मिळाल्या होत्या.

आरोपींना पकडण्यासाठी लुधियाना पोलिसांनी सायबर टीमची मदत घेत व्हॅनचा जीपीएस ट्रॅक करत माहिती मिळवली. या चोरीच्या घटनेत सहभागी असलेल्या 5 लोकांना अटक करण्यात आली होती, त्याच्याकडून 5 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. पण, मास्टर माइंड मनदीप कौर उर्फ मोना तिचा पती आणि 5 लोक अजूनही फरार होते.

पोलिसां आरोपी मोना हिचा सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटांच्या बंड्डल सोबतचा व्हिडीओ मिळाला होता. पोलीस सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याने त्यांच्या सर्व हालचाली पोलिंसाना समजत होत्या. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कटात सीएमएस कंपनीचा एक कर्मचारीही सहभागी होता. तो कंपनीत चार वर्षांपासून काम करत होता, यामुळे त्याला कॅशव्हॅनची पूर्ण माहिती होती.

असा लावला आरोपींचा शोध

कॅशव्हॅन चोरी केल्यानंतर फरार झालेली मनदीप उर्फ मोना हेमकुंड साहिब येथे दर्शनाला गेली असल्याचे पोलिसांना समजताच मनदीपला पकडण्यासाठी पोलिसांनी फ्री मध्ये फ्रूटी देण्याचा कट रचला. याच फ्रीची फ्रूटी पिण्यासाठी थांबलेली असताना मनदीप उर्फ मोना पकडली गेली.

पोलीस अधिकारी मनदीप सिंह सिद्धू यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीचा प्लॅन यशस्वी झाल्याने मनदीप कौर उर्फ मोना आपल्या पतीसोबत हेमकुंड येथे दर्शनाला गेली होती. हेमकुंड येथून परततांना मनदीप कौर उर्फ मोनाला अटक करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.