मुलाला मॅसेज आला ‘अम्मी को देखना है तो…’, महिलेचा पती आणि बहिण सदर पत्त्यावर पोहचले तर…

मुलाला एक मॅसेज आला. तो मॅसेज पाहिल्यानंतर मुलाच्या वडिलांनी सदर ठिकाणी धाव घेतली. तिथे पोहचताच समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

मुलाला मॅसेज आला 'अम्मी को देखना है तो...', महिलेचा पती आणि बहिण सदर पत्त्यावर पोहचले तर...
कौटुंबिक वादातून मेव्हण्याने भावोजीला संपवले
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 7:52 PM

अंबरनाथ : कौटुंबिक वादातून बदलापूरमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याच्या घटनेला काही वेळ उलटत नाही तोच लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याचे उघडकीस आले. यानंतर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली. अंबरनाथ परिसरातील स्वानंद सेंटरमधील साईलीला लॉजवर ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. महिला दोन दिवसापूर्वीच आपल्या लिव्ह पार्टनरसोबत या लॉजमध्ये आली होती. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

‘अशी’ उघडकीस झाली घटना

महिला एका व्यक्तीसोबत 15 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. दोन दिवसांपूर्वीच अंबरनाथमधील साईलीला लॉजमध्ये लिव्ह इन पार्टनरसोबत आली होती. शुक्रवारी सकाळी महिलेच्या लिव्ह इन पार्टनरने तिच्या मुलाला मॅसेज केला. “अम्मी को आखरी बार देखना है, तो अंबरनाथ ईस्ट, स्वानंद शॉपिंग सेंटर, चौथा माला” असं मॅसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. मॅसेज आल्यानंतर महिलेचा पती आणि तिची बहिण तात्काळ त्या पत्तायवर दाखल झाले.

लॉजमधील रजिस्टरमध्येही महिलेचे नाव लिहिलेले आढळले. लॉज मालकाने दरवाजा ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. यानंतर लॉज मालकाने शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांच्या समक्ष डुप्लीकेट चावीने लॉजचा दरवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडून पाहिले असता आत महिलेचा मृतदेह पडला होता, तर तिच्यासोबत आलेला व्यक्ती फरार झाला होता.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी मृतेदह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. पोलीस फरार झालेल्या महिलेच्या पार्टनरचाही शोध घेत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि महिलेचा फरार पार्टनर सापडल्यानंतरच सत्य उघडकीस येईल. शिवाजीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.