Nitin Kamath : कॉल सेंटरवर केली 8,000 रुपयांवर नोकरी, आज मुकेश अंबानी यांना द्यायची आहे टक्कर

Nitin Kamath : नितीन कामथ यांनी आकाश विस्तारण्याचे धोरण आखले आहे. म्युच्युअल फंड बाजारात झिरोधा लवकरच पाऊल टाकणार आहे. रिलायन्स जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेच्या माध्यमातून या क्षेत्रात दाखल होत असतानाच ही महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.

Nitin Kamath : कॉल सेंटरवर केली 8,000 रुपयांवर नोकरी, आज मुकेश अंबानी यांना द्यायची आहे टक्कर
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 4:30 PM

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : स्टॉक ब्रोकिंग स्टार्टअप झिरोधाला (Zerodha) एसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) सुरु करण्याचा परवाना मिळाला आहे. झिरोधाने एएमसी मार्केटमध्ये पाऊल टाकण्यासाठी वेल्थ मॅनेजमेंट कंपनी स्मॉलकेस (Small Case) सोबत हातमिळवणी केली आहे. सेबीने झिरोधाला एमएसी सुरु करण्याची मंजूरी दिली आहे. या व्यवसायात झिरोधा आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना टक्कर देणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतीच जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज (Jio Financial Services) ही स्वतंत्र कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध केली आहे. या कंपनीने जगातील सर्वात मोठी एसेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकसोबत करार केला आहे. अशावेळी नितीन कामत (Nitin Kamath) यांची खेळी किती उपयोगी ठरेल हे काळ समोर आणेल.

झिरोधाचे नेट प्रॉफिट वाढले

झिरोधा आज देशातील सर्वात मोठी ऑनलाईन स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये झिरोधाचा शुद्ध नफ्यात मोठी वाढ झाली. तो दुप्पट झाला. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023 मध्ये हा नफा 12 टक्क्यांनी वाढून 2,500 कोटी रुपयांवर पोहचला. तर महसूल 5,500 कोटी रुपयांवर पोहचला. आज झिरोधाच्या ग्राहकांची संख्या जवळपास 1.2 कोटी आहे. कंपनीचे मूल्य दोन अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. निखील कामत आणि नितीन कामत या दोन भावांनी मिळून झिरोधाची स्थापना केली होती. नितीन कामत या कंपनीचे सीईओ तर निखील सीएफओ आहेत.

हे सुद्धा वाचा

कशी झाली सुरुवात

निखील कामत यांनी शाळा लवकर सोडल्यानंतर 17 व्या वर्षी पहिली नोकरी केली. एका कॉल सेंटरमध्ये ते रुजू झाले. त्यांचा पगार केवळ 8000 रुपये होता. त्यानंतर शेअर बाजारात त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी हे काम फार गांभीर्याने केले नाही. पण बाजार कळू लागल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

झिरोधाची सुरुवात

2010 साली दोन्ही भावांनी मिळून झिरोधाची स्थापना केली. हा ब्रँड उभा करताना त्यांनी खूप मेहनत घेतली. आज जरी अब्जाधीश झालो असलो तरी आजही तेवढाच वेळ काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. स्कूल ड्रॉपआऊट ते अब्जाधीशांपर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर निखील कामत यांनी हा पल्ला गाठला आहे.

असे वाढले ग्राहक

2016 पर्यंत झिरोधाकडे 70 हजार ग्राहक होते. त्यानंतर ही संख्या झपाट्याने वाढली. 2022 पर्यंत ही संख्या एक कोटींच्या घरात पोहचली. डिसेंबर 2015 मध्ये कंपनीने झिरो ब्रोकरेज इक्विटी इन्व्हेसिंटगची सुरुवात केली होती. त्यानंतर ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली.

किती आहे संपत्ती

कामत बंधुंनी परदेशी गुंतवणूकदारांच्या जोरावर झिरोधाची सुरुवात केली होती. कंपनीने मोठी उलाढाल केली. तिचा महसूल वाढला, तशी कामत बंधूची नेटवर्थ वाढली. त्यांना फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळाले. 2023 मध्ये नितीन कामत या यादीत 1105 क्रमांकावर होते. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 2.7 अब्ज डॉलर इतकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नितीन कामत यांना 4.16 कोटी रुपये वेतन मिळते. त्यांना घरभाडे म्हणून दोन कोटी रुपये, 1.6 कोटींचे भत्ते आणि 41 लाख रुपये अनुषांगिक भत्ते मिळतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.