Snacks For Weight Loss | वजन कमी करण्यासाठी खाण्यासाठी 7 भारतीय स्नॅक्स!
दह्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असते आणि प्रोबायोटिक्स असतात. दही पचनास मदत करते आणि दह्याने आतडे देखील निरोगी राहतात. त्यामुळे काकडीचा रायता जर बनवला तर तो वजन कमी करण्यास मदत करतो आणि चवीला सुद्धा चांगला असतो.
1 / 7
मोड आलेले कडधान्य ज्याला आपण स्प्राऊट्स म्हणतो ते आरोग्यासाठी चांगले असतात. हे नुसते खायला आपण टाळाटाळ करतो. पण याचं जर सॅलड बनवलं तर ते चवीला चांगलं असतं. यात कॅलरी कमी असतात परंतु फायबर, प्रथिने जास्त असतात. कॅलरी कमी असल्यामुळे हे वजन कमी करण्यास मदत करतं.
2 / 7
मखान्यात कॅलरीज कमी आणि पोषक तत्वे जास्त असतात. भाजलेला मखाना घालून त्याचं तुम्ही चाट बनवू शकता. मखाना हा सध्याचा ट्रेंड आहे. हेल्दी स्नॅक मध्ये मखाना खायचा सल्ला आवर्जून दिला जातो. यात तुम्ही वेगवेगळे मसाले, भाज्या टाकू शकता मग ते चवीला चांगलं लागेल.
3 / 7
ढोकळ्यामध्ये प्रथिने आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट चांगल्या प्रमाणात असतं. कॅलरीची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तळलेल्या ढोकळ्याऐवजी पारंपारिक पद्धतीची वाफवलेला ढोकळा खा.
4 / 7
दह्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असते आणि प्रोबायोटिक्स असतात. दही पचनास मदत करते आणि दह्याने आतडे देखील निरोगी राहतात. त्यामुळे काकडीचा रायता जर बनवला तर तो वजन कमी करण्यास मदत करतो आणि चवीला सुद्धा चांगला असतो.
5 / 7
खिचडी! भारतीय घरांमध्ये खिचडी खूप फेमस आहे. खिचडी खूप हेल्दी असते. वजन कमी करण्यासाठी खिचडी हा उत्तम पर्याय आहे. फायबरयुक्त ओट्स, मसूर आणि भाज्यांसह ही खिचडी बनवली तर त्यात कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त असतात.
6 / 7
फळे आरोग्यासाठी उत्तम असतात. फळांमुळे वजन कमी होतं. फळांचं सॅलड रोज खायची सवय असेल तर ते आरोग्यालाही उत्तम आहे.
7 / 7
बेसन पोळी एक चवदार आणि प्रथिनेयुक्त स्नॅक आहे. बेसन पोळी खाल्ल्यास पोट लवकर भरतं आणि लवकर भूक लागत नाही. बेसन पोळीने ऊर्जा मिळते.