तरुण आणि टवटवीत दिसायचंय? ही फळे खा, वयंच जाईल झाकून!

| Updated on: Aug 27, 2023 | 10:02 PM

काही फळे त्यांच्या उच्च अँटीऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि इतर फायदेशीर गुणांसाठी ओळखली जातात जी आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि आपल्या त्वचेला तरुण दाखवतात. वृद्धत्त्व दिसू द्यायचं नसेल तर तुम्ही ही फळे खाऊ शकता, याने तुमची त्वचा टवटवीत आणि तरुण दिसेल.

1 / 5
निरोगी चरबी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असलेलं एवोकॅडो! हे फळ फॅन्सी आणि महाग असतं त्यामुळे हे फळ काहीच लोकांच्या खिशाला परवडणारं आहे. पण तुम्हाला परवडत असेल तर हे फळ नक्की घ्या याने त्वचा सुंदर आणि तरुण दिसते. हे फळ डिटॉक्सिफिकेशन सुद्धा करतं.

2 / 5
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी सगळ्यात महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे. संत्री खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. या फळाचा नक्कीच आहारात समावेश करावा.

3 / 5
बेरीमध्ये व्हिटॅमिन सी सारख्या अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असतात. ताणतणाव असेल, त्वचा जळजळ करत असेल तर तुम्ही बेरी चे सेवन करायलाच हवे. बेरी चेहऱ्याला फ्रेश ठेवते.

4 / 5
सूर्याच्या किरणांपासून, अतिनील किरणांपासून किवी हे फळ आपल्या त्वचेला वाचवतं. तुम्हाला जर कायम तरुण दिसायचं असेल तर काही फळांचा तुम्ही आहारात समावेश करायला हवा. त्यात किवी हे फळ अग्रस्थानी येतं.

5 / 5
डाळिंब रक्त वाढीसाठी चांगलं असल्याचं तुम्ही ऐकलंच असेल. डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्याने त्वचा निरोगी आणि तरुण दिसते. नियमित डाळिंब खाल्ल्यास तुम्हाला नक्कीच तुमच्या चेहऱ्यात फरक दिसेल. हे फळ आपल्या त्वचेचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.