बिच्चारा! पंतप्रधानांचे नाव विसरला, थेट मंदबुद्धीच ठरला, नवरी गमावून बसला, नंतर ‘बंदुक की नोक पे….’

| Updated on: Jun 20, 2023 | 4:33 PM

पंतप्रधान कोण असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. पण, त्यांचे नाव त्याला सांगता आले नाही. त्यावरून त्याला थेट मंदबुद्धी असे हिणवण्यात आले. तरुणीने त्याच्यासोबत संबंध तोडले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या...

बिच्चारा! पंतप्रधानांचे नाव विसरला, थेट मंदबुद्धीच ठरला, नवरी गमावून बसला, नंतर बंदुक की नोक पे....
PM NARENDRA MODI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

गाझीपूर : उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील नसीरपूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नसीरपूर गावातील शिवशंकर राम यांचे करंडा येथील बसंत पट्टी येथे राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न ठरले. हिंदू रितीरिवाजानुसार लग्नासाठी 11 जूनचा मुहूर्त काढण्यात आला. तारीख निश्चित झाल्यानंतर लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली. ठरलेल्या दिवशी 11 जून रोजी शिवशंकर लग्नाची मिरवणूक घेऊन भावी पत्नीच्या घरी पोहोचला. विवाह सोहळा पार पडत होता. सकाळी खिचडी समारंभ सुरु होता. या सभारंभात वधूच्या बहिणींनी नवरदेवाला गंमतीने काही प्रश्न विचारले. वधूच्या लहान बहिणीने शिवशंकरला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले. बराच वेळ होऊनही शिवशंकरला पंतप्रधान कोण हे सांगता आले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न सांगू शकल्याने वधूच्या कुटुंबीयांना तो अपमान वाटला. शिवशंकर यांचे ज्ञान त्यांना अल्प वाटले शिवाय त्यांनी त्यांना थेट मतिमंदच ठरवले. तर, शिवशंकरचे अल्प ज्ञान पाहून कुटुंबासोबतच वधूही संतापली. दोन्ही कुटुंबात जोरदार भांडण सुरु झाले. चिडलेल्या वधूने थेट लग्न मोडल्याची घोषणा केली.

हे सुद्धा वाचा

वधूच्या कुटूंबियांनी बंदूकीचा धाक दाखवत वधूचा दुसरा विवाह त्याच वराच्या लहान भावासोबत लावला. तर, इकडे वराने पोलिस स्टेशन गाठले. यानंतर दोन्ही पक्षांना सैदपूर कोतवाली येथे बोलावण्यात आले. यावेळी वराच्या वडिलांनी, त्यांच्या धाकट्या मुलाचे वय अजून लग्नाचे नाही असे सांगितले. बंदुकीचा धाक दाखवून हे लग्न लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रार आल्यानंतर कारवाई करू

सैदपूर पोलिस स्टेशनच्या कोतवाल वंदना सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे नाव न सांगितल्यामुळे आपले लग्न रद्द केले असे सांगून एक तरुण कोतवालीला आला होता. यानंतर त्याच्या कुटुंबीयांना बोलावून तरुणाला परत पाठवण्यात आले. त्यांच्याकडे कोणतीही लेखी तक्रार केली नाही. याप्रकरणी लेखी तक्रार आल्यानंतर हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.