पत्नी दुचाकीवरुन चालली होती, रस्त्यात तिला पतीची गाडी दिसली, आत डोकावून पाहिले तर…

| Updated on: Jun 19, 2023 | 5:55 PM

पती तीन दिवसांपासून घरीच आला नव्हता. पत्नी त्याचा शोध घेत होती. मात्र त्याचा पत्ताच लागत नव्हता. पत्नी दुचाकीवरुन चालली असताना तिला पतीची कार दिसली. तिने जाऊन पाहिले अन् तिला धक्काच बसला.

पत्नी दुचाकीवरुन चालली होती, रस्त्यात तिला पतीची गाडी दिसली, आत डोकावून पाहिले तर...
तीन दिवसापासून बेपत्ता व्यक्तीचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

पनवेल : पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन दिवसापासून बेपत्ता व्यक्ती स्वतःच्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर 17 मध्ये उभ्या चारचाकी गाडीमध्ये आज सकाळी मृतदेह आढळून आल्याने गोंधळ उडाला. याबाबत खांदेश्वर पोलिसांनी माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्रशांत खुलचंद शर्मा असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शर्माचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला हे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल.

तीन दिवसापासून बेपत्ता होता

नवीन पनवेल सेक्टर 17 या ठिकाणी असलेल्या उत्सव बार समोरील रस्त्यावर सिल्वर रंगाच्या मारुती स्विफ्ट गाडीमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला. प्रशांत खुशलचंद शर्मा गेल्या तीन दिवसापासून प्रशांत शर्मा हे आपल्या राहत्या घरी गेले नव्हते. त्यामुळे त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती. आज सकाळी सेक्टर 16 येथून आपल्या दुचाकीवरून सेक्टर 17 येथे जात असताना, तिला आपली गाडी उत्सव बार समोर उभी असलेली आढळली.

गाडीत मृतावस्थेत आढळला

तिने तात्काळ गाडीकडे धाव घेत आत डोकावले असता प्रशांत हा ड्रायविंग सीटवर आडवा झालेला आढळला. खूप प्रयत्न करुन तिने गाडीचा दरवाजा उघडला असता आत प्रशांत मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच खान्देश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सुरु केला. प्रशांतचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप कळू शकले नाही.

हे सुद्धा वाचा