अजितदादा शांत…अन् छगन भुजबळ अटॅक मूडमध्ये! शरद पवार यांच्यावर भुजबळांचा थेट निशाणा, म्हणाले…

| Updated on: Sep 13, 2023 | 12:57 PM

VIDEO | अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर थेट निशाणा पण अजित पवार गप्प बसणार? का केलं शरद पवार गटाचं भुजबळांविरोधात आंदोलन, बघा स्पेशल रिपोर्ट

Follow us on

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३ | शरद पवार यांच्या सभेला उत्तर म्हणून अजित पवार गटाकडून दोन उत्तरसभा झाल्यात. या दोन्ही सभांमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर बोलणं टाळलंय. मात्र बीडमध्ये झालेल्या सभेत छगन भुजबळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शरद पवार गटाने रस्त्यावर याविरोधात आंदोलन केले. शरद पवार गटानं अजित पवार गटाविरोधात पहिली सभा येवल्यात घेतली. त्या सभेतून येवल्यात उमेदवार देताना आपली चूक झाली असे म्हणत माफी मागतो, असे शरद पवार म्हणाले तर बीडमध्ये वय काढणाऱ्या अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली. या दोन्ही टीकेवर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं. बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट, नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ….