हिंदू धर्मात महिला का फोडत नाही नारळ? अशी आहे यामागची मान्यता

| Updated on: Aug 25, 2023 | 7:02 PM

देवाला नारळ (Coconut in Puja)  अर्पण करणे शुभ मानले जाते. विशेष पूजा, यज्ञ, हवन आणि अनेक शुभ कार्ये नारळाशिवाय अपूर्ण मानली जातात. पण स्त्रिया पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडत नसल्याचे आपण अनेकदा पाहतो.

हिंदू धर्मात महिला का फोडत नाही नारळ? अशी आहे यामागची मान्यता
नारळ
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मातील कोणत्याही पूजेमध्ये नारळ अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये नारळ असणे आवश्यक आहे. नारळ हे एक फळ आहे, जे अत्यंत पवित्र मानले जाते. देवाला नारळ (Coconut in Puja)  अर्पण करणे शुभ मानले जाते. विशेष पूजा, यज्ञ, हवन आणि अनेक शुभ कार्ये नारळाशिवाय अपूर्ण मानली जातात. पण स्त्रिया पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ फोडत नसल्याचे आपण अनेकदा पाहतो. ही परंपरा नवीन नसून अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. जेव्हा स्त्रिया पूजेत नारळ देऊ शकतात, तर ते  फोडू शकत का नाहीत? यामागचे कारण जाणून घेऊया.

या कारणांमुळे महिला नारळ फोडत नाहीत

  • पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.
    ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवता नारळात वास करतात असे मानले जाते. तीन देवतांच्या उपस्थितीमुळे महिलांनी नारळ फोडू नये असे म्हणतात.
  • नारळ हे भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते. ज्यावर देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच माता लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही.
  • नारळ हे बीज मानले गेले आहे आणि स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते, म्हणून नारळ फोडणे स्त्रियांसाठी योग्य मानले जात नाही. असं म्हटलं जातं की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात.
  • अशी धार्मिक मान्यता आहे की एकदा विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर कोपून वेगळा स्वर्ग निर्माण केला आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळाचे रूप धारण केले. त्यामुळे नारळ देखील मानवी रूप मानले जाते. नारळात तीन छिद्र हे तीन डोळ्यांचे प्रतिक मानतात. या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप मानले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)