मुंबई : वट सावित्री व्रत यावेळी 3 जून 2023 रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाईल. गुजरात आणि महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा (Vat Purnima 2023) व्रत पाळले जाते, याला येथे वट सावित्री व्रत असेही म्हणतात. देशाच्या इतर सर्व भागात वट सावित्री वट जेष्ठ महिन्याच्या अमावास्येला केली जाते. पंचांगानुसार 3 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे. सकाळी 11 वाजून 17 मिनीटाने पैर्णिमा प्रारंभ होईल व दुसऱ्या दिवशी 4 जूनला सकाळी 9.11 वाजता पौर्णिमा समाप्ती होईल. या काळात वड पूजा करता येईल.
वटवृक्षात ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या निवासाशिवाय आणखी एक महत्त्वाची घटना या वृक्षाशी निगडीत आहे. धार्मिक पौराणिक कथेनुसार, वडाच्या झाडाखाली देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन दिले. देवी सावित्रीला तिचा नवरा पुन्हा मिळाला होता, म्हणून स्त्रिया हे व्रत पाळतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. याशिवाय जैन तीर्थंकर ऋषभदेव यांनीही अक्षय वटखाली तपश्चर्या केल्याचे मानले जाते. प्रयागमधील हे ठिकाण भगवान ऋषभदेवांची तपस्थळी म्हणून ओळखले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)