Raksha Bandhan 2023 : भद्रा काळात का बांधू नये राखी, अशी आहे यामागची पौराणिक कथा

| Updated on: Aug 23, 2023 | 10:47 AM

भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्राही स्वभावाने उग्र आहे. असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकालात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही.

Raksha Bandhan 2023 : भद्रा काळात का बांधू नये राखी, अशी आहे यामागची पौराणिक कथा
रक्षा बंधन
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : दरवर्षी रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी 30 ऑगस्ट 2023 रोजी श्रावण पौर्णिमा आहे. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण बहीण आणि भावाच्या परस्पर प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यापूर्वी भद्राकाळ (Bhadra Kaal) आणि राहुकालकडे विशेष लक्ष दिले जाते. शास्त्रानुसार भद्रा काळात राखी बांधणे शुभ नाही. असे मानले जाते की भद्राकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य केल्याने यश मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकालमध्ये भावाच्या मनगटावर राखी का बांधायची.

भद्रा काळात का बांधू नये राखी?

भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे, त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्राकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत, या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रा काळ लागतो , तेव्हा बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाहीत. तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते.

दुसर्‍या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे. न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्राही स्वभावाने उग्र आहे. असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकालात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही. भद्राशिवाय राहुकालमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते. रक्षाबंधनाचा सण भद्राकाळ वगळता शुभ काळात साजरा करावा, असे शास्त्रात सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

या वर्षीही श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्टला दिवसभर भाद्राची सावली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावाला 30 ऑगस्टला रात्री 9 नंतर किंवा 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजेपर्यंत राखी बांधू शकता. यावेळी भद्रा नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)