Onam 2023 : आजपासून सुरू होतोय दक्षिण भारतातला महत्त्वाचा सण ओणम, असे आहे या सणाचे महत्त्व

| Updated on: Sep 13, 2023 | 12:56 PM

ओणम (Onam 2023), ज्याला मल्याळम भाषेत तिरुवोनम असेही म्हणतात, हा 10 दिवसांचा उत्सव 20 ऑगस्ट रोजी सुरू झाला. ओणम सण साजरा करण्यामागे अनेक समजुती आहेत, त्यापैकी एका नुसार हा सण दानवीर असुर राजा बालीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

Onam 2023 : आजपासून सुरू होतोय दक्षिण भारतातला महत्त्वाचा सण ओणम, असे आहे या सणाचे महत्त्व
ओणम
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आज म्हणजेच 29 ऑगस्टला ओणम हा दक्षिण भारताचा मुख्य सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. ओणम (Onam 2023), ज्याला मल्याळम भाषेत तिरुवोनम असेही म्हणतात, हा 10 दिवसांचा उत्सव 20 ऑगस्ट रोजी सुरू झाला. शेतात चांगले पीक येण्यासाठी ओणम साजरा केला जातो. केरळमध्ये महाबली नावाचा राजा होता असे म्हणतात. त्यांच्या सन्मानार्थच ओणम सण साजरा केला जातो. हा सण भगवान विष्णूच्या वामन अवतारालाही समर्पित आहे.

ओणम सणाचे महत्त्व

ओणम हा सण चिंगम महिन्यात साजरा केला जातो. मल्याळम लोक चिंगम हा वर्षाचा पहिला महिना मानतात. दुसरीकडे, हिंदू कॅलेंडरनुसार, चिंगम महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. ओणमच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. या उत्सवात लोक 10 दिवस फुलांनी घर सजवतात आणि विधीनुसार भगवान विष्णू आणि महाबली यांची पूजा करतात. ओणमचा हा सणही नवीन पिकाच्या आगमनाच्या आनंदात साजरा केला जातो.

अशाप्रकारे केली जाते पूजा

ओणमच्या दिवशी सकाळी मंदिरात जाऊन भगवान विष्णूची पूजा केली जाते. केळीचे पापड वगैरे नाश्त्यात खाल्ले जातात. यानंतर लोकं ओणमची माला किंवा पाकलं बनवतात. या दिवशी लोकं आपले घर फुलांनी सजवतात. याशिवाय केरळमध्ये ओणम सणावर बोट शर्यत, म्हैस आणि बैलांच्या शर्यती इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात.

हे सुद्धा वाचा

ओणम हा सण का साजरा केला जातो?

ओणम सण साजरा करण्यामागे अनेक समजुती आहेत, त्यापैकी एका नुसार हा सण दानवीर असुर राजा बालीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. असे म्हणतात की विष्णूजींनी वामनाचा अवतार घेऊन बळीचा अभिमान मोडला, परंतु त्याची वचनबद्धता पाहून विष्णूजींनी त्याला अधोलोकाचा राजा बनवले. दक्षिण भारतातील लोकांचा असा विश्वास आहे की ओणमच्या पहिल्या दिवशी राजा बळी पाताळ लोकातून पृथ्वीवर येतो आणि आपल्या प्रजेच्या स्थितीची काळजी घेतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)