Dussehra 2022: कधी साजरा होणार यंदाचा दसरा, मुहूर्त तिथी आणि महत्त्व

| Updated on: Sep 21, 2022 | 11:22 AM

विजयादशमीच्या (Vijayadashmi) दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. या वर्षी दसरा हा सण बुधवार, 05 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे.

Dussehra 2022: कधी साजरा होणार यंदाचा दसरा, मुहूर्त तिथी आणि महत्त्व
दसरा
Image Credit source: Social Media
Follow us on

Dussehra 2022: दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो. याला विजयादशमी किंवा आयुधा पूजा असेही म्हणतात. देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण प्रत्येक व्यक्तीला वाईटावर चांगल्याच्या विजयाची शिकवण देतो. विजयादशमीच्या (Vijayadashmi) दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. या वर्षी दसरा हा सण बुधवार, 05 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी रावण आणि त्याचा भाऊ कुंभकरण आणि त्याचा मुलगा मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे ठिकठिकाणी दहन केले जाते.

विजयादशमी तिथी

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा साजरा केला जातो. दिवाळीच्या 20 दिवस आधी दसरा येतो. यंदा बुधवार 05 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा होणार आहे. याआधी अश्विन नवरात्र येते.

विजयादशमी पूजेचा मुहूर्त

आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला विजयादशमी साजरी केली जाईल. यावेळी अश्विन शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार, 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:20 पासून सुरू होईल. दशमी तिथीची समाप्ती बुधवार 05 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होईल. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 02.13 ते 3:00 पर्यंत आहे.

हे सुद्धा वाचा

विजयादशमीचे महत्त्व

भगवान श्रीरामांनी दसर्‍याच्या दिवशी अहंकारी रावणाचा वध केला. म्हणून या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी आयुध म्हणजे शस्त्राची पूजा केली जाते. तसेच विद्याचीसुद्धा पूजा केली जाते. यादिवशी आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा दिल्या जातात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)