मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये पत्रिकेत अनेक शुभ आणि अशुभ योग सांगण्यात आले आहेत. या योगाचा जातकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. यातील एक महत्त्वाचा योग म्हणजे कालसर्प (Kalsarpa Yoga) योग. काल सर्प योगाबद्दल सामान्यतः लोकांमध्ये भीतीची भावना असते. काल सर्प योग अशुभ फल देणारा मानला जातो, तो दोष मानला जातो. काल सर्प योग केवळ अशुभ आहे असे नाही, तर काल सर्प योग शुभ फलही देतो. अनेकांच्या पत्रिकेत कालसर्प योग शुभ सिद्ध होतो, ज्यांच्या कुंडलीत काल सर्प योग शुभ असतो त्यांचे जीवन एखाद्या राजापेक्षा कमी नसते. या लोकांनी आपापल्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठली आहेत.
शनीच्या साडेसाती प्रमाणेच काल सर्प योगालाही लोकं घाबरतात. बऱ्याचदा हा योग आपल्या पत्रिकेत शुभ आहे की अशुभ याची शहानिशाही अनेक जण करत नाही. पत्रिकेत राहू आणि केतू यांच्यामध्ये सर्व ग्रह आले की कालसर्प योग तयार होतो. काल सर्प योग एखाद्या व्यक्तीसाठी शुभ किंवा अशुभ असू शकतो किंवा राहू आणि केतूच्या स्थितीवर अवलंबून असतो. जर काल सर्प योग शुभ आणि फलदायी असेल, तर व्यक्तीला त्याच्या आंतरिक कमकुवतपणावर मात करण्याची संधी मिळते, तो आपल्या आयुष्यात सतत पुढे जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत राहु वृषभ किंवा मिथुन राशीत असतो, तो व्यक्ती राहूच्या दशेत यशाच्या शिखरावर पोहोचतो. याशिवाय काल सर्प योगसुद्धा उच्च गुरू असलेल्या व्यक्तीला लाभ देतो. काल सर्प योग असलेल्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरु आणि चंद्र एकमेकांच्या मध्यभागी किंवा एकत्र बसलेले असतील तर अशी व्यक्ती सतत प्रगती करत असते. असा माणूस कोणत्याही क्षेत्रात गेला तरी त्याला उच्च पद आणि प्रतिष्ठा मिळते.
जर काल सर्प योगाने अशुभ फल मिळत असेल तर त्याला काल सर्प दोष म्हणतात. काल सर्प दोष खूप वेदनादायक असतो. त्यामुळे करिअरमध्ये अडथळे येतात, उत्पन्नात अडथळे येतात. कामात अपयश देतो. म्हणूनच काल सर्प दोष टाळण्यासाठी उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात. यासाठी नागपंचमी किंवा सोमवार खूप शुभ आहे. काल सर्प दोष दूर करण्यासाठी शिवलिंगावर चांदीचा नाग अर्पण करावा. वाहत्या पाण्यात चांदी किंवा तांब्याची नाग-नाग जोडी प्रवाहित करावी, काल सर्प दोषापासून आराम मिळतो. याशिवाय राहु दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळ्या कुत्र्याला भाकरी खावू घाला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)