World Cup 2023 | वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, आयसीसीचा मोठा निर्णय

| Updated on: Aug 27, 2023 | 4:45 PM

Indian Cricket Team World Cup 2023 | टीम इंडियाला आयसीसीने घेतलेल्या त्या एका निर्णयामुळे वनडे वर्ल्ड कपआधी मोठा झटका लागला आहे.

1 / 5
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा भारताला वनडे वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. मात्र या यजमानपदाचा टीम इंडियाला फायदा कमी आणि तोटाच जास्त आहे. आयसीसीने पीचबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सानुसार,  3 ऑगस्टला आयसीसीचे चीफ क्युरेटर एंडी एटकिंसन आणि इतर सर्व पीच क्युरेटर यांच्यात बैठक पार पडली. सराव सामन्यांसह इतर सर्व सामन्यात पीच तयार करताना होम टीमच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका, असं स्पष्ट शब्दात एंडी एटकिंसन यांनी इतर सर्व क्युरेटर यांना सांगितलं.

2 / 5
वर्ल्ड कप ज्या देशात आयोजित केला जातो, तेथील टीमला होम एडव्हान्टेजचा फायदा मिळतो. मात्र यावेळेस टीम इंडियाला भारतात वर्ल्ड कप होत असल्याचा काहीच फायदा होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

3 / 5
"पीच तयार करताना कोणत्याही प्रकारे होम टीमच्या दबावात येऊ नका. पीच तयार करताना होम टीमला त्याचा फायदा होणार नाही, याची काळजी घ्या", अशी माहिती एका सूत्राने टेलिग्राफला दिली.

4 / 5
आयसीसीने वर्ल्ड कपआधी सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलंय. सराव सामन्यांचं आयोजन हे 29 सप्टेंबर-3 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. टीम इंडिया आपला पहिला सराव सामना हा 30 सप्टेंबरला  इंग्लंड विरुद्ध गुवाहाटी इथे खेळणार आहे. त्यानंतर दुसरा सामना हा 3 ऑक्टोबरला नेदरलँड विरुद्ध होणार आहे.

5 / 5