Sunil Gavaskar : ‘येत्या 10 ते 15 वर्षांमध्ये…’; नीरज चोप्राने गोल्ड जिंकल्यानंतर सुनील गावसकर यांची मोठी भविष्यावाणी!

| Updated on: Aug 28, 2023 | 8:24 PM

Sunil Gavaskar on Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ऑलिम्पिकनंतर जागतिक अॅथलेटिक चॅम्पियनशीपमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अशातच नीरजच्या सुवर्ण कामगिरीनंतर गावसकरांनी भविष्यवाणी केली आहे.

1 / 5
गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने जागितक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये इतिहास रचला आहे. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फायनलमध्ये सुवर्णदक जिंकत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. नीरजच्या या यशानंतर सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. अशातच माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी एक भविष्यवाणी केलीये.

2 / 5
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले खूप आनंद झाला. नीरजच्या या यशामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते. फायनलमध्ये फक्त नीरज नाहीतर आणखी दोन भारताचे भालाफेकपटू होते. एकजण अशी दैदिप्यमान कामगिरी करतो तेव्हा इतरही आणखी त्यात आवडीने रस घेतात, असं सुनील गावसकर म्हणाले.

3 / 5
सुनील गावसकर यांनी नीरज चोप्रा यांचं भरभरून कौतुक केलं. यावेळी बोलताना त्यांनी एक मोठी भविष्यवाणीही केली. अमेरिका-ऑस्ट्रेलियाला स्पोर्टिंग कंट्री म्हटलं जातं आणि मला वाटते की पुढील 10-15 वर्षात भारत देखील एक स्पोर्टिंग देश म्हणून ओळखला जाईल, अशी भविष्यवाणी गावसकर यांनी केली.

4 / 5
नीरज चोप्रा याचा पहिला फाऊल गेला होता पण दुसऱ्याच प्रयत्नात त्याने सर्वात लांब 88.17 मीटर भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं.

5 / 5
गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्राने सर्वांचे रात्री जागे राहून पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.