Chandrayaan 3 Moon Landing : चांद्रयान 3 चांद्रभूमीवर उतरताना काय अडचणी येऊ शकतात? जाणून घ्या सोप्या भाषेत…

| Updated on: Aug 23, 2023 | 1:16 PM

Chandrayaan-3 latest news : चांद्रयान 3 लँडिंगमध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात? कोणता टप्पा अधिक महत्वाचा आहे? चांद्रयान चांद्रभूमीवर पोहोचल्यावर काय करेल? खगोल अभ्यासक लीना बोकील काय म्हणाल्या?; वाचा सविस्तर...

Chandrayaan 3 Moon Landing : चांद्रयान 3 चांद्रभूमीवर उतरताना काय अडचणी येऊ शकतात? जाणून घ्या सोप्या भाषेत...
Follow us on

पुणे | 23 ऑगस्ट 2023 : चांद्रयान 3 आज संध्याकाळी चंद्रावर लँड होणार आहे. मात्र या लँडिंगवेळी काही अडचणी येऊ शकतात. याविषयी खगोल अभ्यासक लीना बोकील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. या लँडिंगवेळी काय अडचणी येऊ शकतात, यावर त्यांनी भाष्य केलंय. शेवटची 15 मिनीटं सॉफ्ट लँडिंगसाठी अतिशय महत्वाची आहेत. चांद्रयान चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. त्याचा वेग खूप आहे. त्या वेगाला हवेतच ब्रेक करायचं आहे. या यानाचा वेग खूप जास्त आहे. हळूहळू त्याचा वेग कमी करावा लागतो. त्याच वेगात यान आपली दिशा बदलतं हे खूप महत्त्वाचं आहे, असं लीना बोकील म्हणाल्या आहेत.

प्री लँडिंग अतिशय महत्त्वाचं आहे. कारण चांद्रयान 25 किलोमीटर अंतरावर असताना हे सगळं घडणार आहे. त्याच वेगाने त्याला वर्तिकली खाली आणायचं आहे. सगळ्या कामांड्स या पृथ्वीवरून जाणार आहेत. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. एकुण 5 फेज मध्ये लँडिंग होईल, असंही लीना बोकील म्हणाल्या.

वेगाने येणाऱ्या यानाला वर्टीकल करावं लागतं. वेग नियंत्रित करावा लागतो. 1200 KMPH ने तो लँड होईल. हा या लँडिंग प्रोसेसमधला महत्वाचा टप्पा आहे. यानातली डीवायसीस व्यवस्थित रित्या चेक करणं. कारण हवेत यानाला हादरे बसले असतात. ते चेक करून घेणं महत्त्वाचं असतं. 7.4 KM असताना वेग कमी करत करत आणला जातो, असंही बोकील यांनी सांगितलं आहे.

सपाट पृष्ठभाग मिळाल्यावर लँडिंग केलं जाईल. फायदे काय होतील. इस्रोची कॅपॅसिटी आहे, हे सिद्ध होईल. अतिशय हाय टेक्नॉलॉजी यात वापरण्यात आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आहे का हे समजेल.आज यशस्वीरित्या लँडिंग झालं तर पुढचे सगळे मिशन व्यवस्थित रित्या यशस्वी पार पाडता येतील. चंद्रावरती धातू आणि आणखीन काही घटक आहेत का जसे कॅल्शियम मॅग्नेशियम हे चेक करता येतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.

चंद्रावरच्या मुख्य वातावरणाचा शोध लावता येईल चंद्रावर देखील भूकंप होतात याचा अभ्यास देखील केला जाईल. तेच चंद्रयान पृथ्वीवरचा देखील अभ्यास करेल. चांद्रयान 2 मोहीम याचं वेळेत अपयशी झाली होती. 2 km अंतर असताना तो कोसळला होता. त्यामुळे या भागात काळजी घ्यावी लागेल.

पुढचे 14 दिवस या चांद्रमोहिमेसाठी महत्वाचे आहेत. प्रज्ञान लोअरद्वारे अनेक प्रयोग होतील. चंद्रावरची माती आणून त्यावर अनेक प्रक्रिया करता येतील. इस्रो आणि आपल्या अशोक स्तंभाचे ठसे चंद्रावरच्या मातीवर आज उमटतील, असंही लीना बोकील म्हणाल्या.