Nawab Malik | नवाब मलिक राष्ट्रवादीचा कुठला गट निवडणार ते ठरलं, सूत्रांची महत्त्वाची माहिती

| Updated on: Aug 15, 2023 | 3:46 PM

Nawab Malik | कोणाला साथ द्यायची ते नवाब मलिक यांनी ठरवलं?. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 या दिवशी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती.

Nawab Malik | नवाब मलिक राष्ट्रवादीचा कुठला गट निवडणार ते ठरलं, सूत्रांची महत्त्वाची माहिती
nawab malik
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांची काल तुरुंगातून सुटका झाली. मनी लाँड्रिग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झालाय. सर्वोच्च न्यायलयाने काही दिवसांपूर्वी त्यांना जामीन मंजूर केला होता. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन देण्यात आला आहे. नवाब मलिक तुरुंगाबाहेर आल्यापासून ते कोणाची साथ देणार? हा प्रश्न विचारला जातोय. आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली.

नवाब मलिक कोणाला पाठिंबा देणार ते ठरलं?

नवाब मलिक तूर्तास आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. एक आठवड्यानंतर ते भूमिका जाहीर करतील. सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठीं भेटीगाठी सुरु आहेत. राजकीय भूमिकेबाबत तूर्तास तरी, नवाब मलिक यांचा कोणताही निर्णय झालेला नाही. नवाब मलिक राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांना पाठिंबा देणार आहेत. टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

नवाब मलिक यांना कधी अटक झालेली?

नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यांचं वजन 25 ते 30 किलोने घटलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी प्रकृतीची काळजी घेण्यात सांगितलं आहे असं त्यांचे बंधू कप्तान मलिक म्हणाले. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 या दिवशी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती.

नवाब मलिक यांना कुठला आजार?

तब्बल दीड वर्षांनंतर नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचारांसाठी जामीनाची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.

प्रफुल्ल पटेल नवाब मलिक यांची भेट घेतल्यानंतर काय म्हणाले?

“राजकीय विषयावर चर्चा केलेली नाही. 25-30 वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. माणुसकी म्हणून, मित्र म्हणून त्यांना भेटायला आलो. ही केवळ सदिच्छा भेट होती. राजकीय भेट नव्हती. दुसरा कुठलाही अर्थ काढू नका.त्यांची प्रकृती सुधारल्याशिवाय दुसरे कुठलेही काम त्यांनी करू नये, असंच आमचं म्हणणं आहे” असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत.