Nawab Malik | नवाब मलिक यांच्या प्रकृतीबद्दल भावाकडून महत्त्वाची माहिती, तुरुंगात किती किलोने वजन घटलं?

| Updated on: Aug 15, 2023 | 1:29 PM

Nawab Malik | अजित पवार की, शरद पवार नवाब मलिक कुठे जाणार? भावाने काय सांगितलं? "दोन महिने का होईना भाऊ आमच्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे" असं कप्तान मलिक यांनी सांगितलं.

Nawab Malik | नवाब मलिक यांच्या प्रकृतीबद्दल भावाकडून महत्त्वाची माहिती, तुरुंगात किती किलोने वजन घटलं?
nawab malik
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मनी लाँड्रिग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायलयाने काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. सोमवारी नवाब मलिक तुरुंगाबाहेर आले. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन देण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्या प्रकृतीबद्दल त्यांचे बंधू कप्तान मलिक यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. प्रकृतीच्या कारणास्तवर त्यांना 2 महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यांचं वजन 25 ते 30 किलोने घटलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी प्रकृतीची काळजी घेण्यात सांगितलं आहे असं कप्तान मलिक म्हणाले.

“आम्हाला देखील त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे. माझी बहीण डॉक्टर आहे. दोन दिवसानंतर त्यांच्या प्रकृती संबंधात ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत, त्या कुटुंबीयांकडून केल्या जातील आणि त्यांची प्रकृती ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे” असं कप्तान मलिक म्हणाले.

‘दोन महिने का होईना भाऊ आमच्यासोबत आहे’

“आज स्वातंत्र्य दिन आहे, तिकडे देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले तर दुसरीकडे माझ्या भावाला स्वातंत्र्य मिळून एक दिवस झालेला आहे. दिवाळी साजरी करतोय. आनंदाच उत्साहाच वातावरण आहे. मिठाई वाटण्यात आली. दोन महिने का होईना भाऊ आमच्यासोबत आहे, याचा मला आनंद आहे” असं कप्तान मलिक यांनी सांगितलं.

‘आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती साथ दिलीय’

“माझा भाऊ माझ्यासाठी वडिलांच्या जागी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती, मला साथ दिलेली आहे. त्यामुळे एक इमोशनल बॉण्डिंग आमच्यात त्या ठिकाणी आहे आणि लवकरात लवकर तो बरा व्हावा अशी मी प्रार्थना ईश्वराकडे करतोय” असं कप्तान मलिक म्हणाले.

‘जान है, तो जहान है’

“भाऊ कुठे जाईल हे सांगता येत नाही. पण सध्या तरी, मला असं वाटतं की दोन महिने ते प्रकृतीवरच लक्ष देतील. त्यांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावं, जान है तो जहान है, राजकारण होतंच राहील” असं कप्तान मलिक यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली.