अरे बापरे, बाळाच्या झोक्यात नाग शिरला, सापाच्या मागे मुंगूस, थरार व्हिडीओत पाहा

| Updated on: Jun 20, 2023 | 12:19 PM

या व्हिडीओतला थरार पाहण्याआधी मुंगूस आणि सापाचं काय नातं असतं, विषारी सापालाही मुंगूस कसा संपवतो, हे निश्चितच यात वाचा, शिवाय कोणत्या देशात मुंगूस प्राण्याने सापांना संपवलं , पण यानंतर काय दुष्परिणाम झाले आणि मुंगूस कसे कमी करावे लागले हे देखील वाचा.

अरे बापरे, बाळाच्या झोक्यात नाग शिरला,  सापाच्या मागे मुंगूस, थरार व्हिडीओत पाहा
Follow us on

नाशिक : ही घटना आपल्या महाराष्ट्रातील आहे. बाळाच्या झोक्याची झोळी जमीनीपासून एकदीड फूट अंतरावर होती. यात अचानक घरातील ओट्याच्या बाजूला नाग निघाला आणि त्याच्यामागे होता मुंगूस. मुंगस हा सापाला संपवण्याच्या प्रयत्नात त्याच्या मागे होता. तो साप मात्र आपला जीव वाचवत होता. सापाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न अतिशय केविलवाणा होता. साप अखेर ओट्यावर चढला. त्या ओट्यावर झोक्यात एक बाळ शांतपणे झोपलेलं होतं. हा सर्व प्रकार मोबाईल फोनमध्ये कैद होत होता. पण साप जेव्हा बाळाच्या झोक्याकडे वळला तेव्हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.

हे घर तसं शेतात आहे, असंच दिसतंय. हा व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. जून महिन्यात मोठ्या प्रमाणात साप हे बिळाबाहेर येतात. मुंगूस हा प्राणी सापाच्या मागेच असतो. हा साप बाळाच्या झोळीला लटकला यानंतर झोक्याच्या दोरीवर चढत, त्याने कपडे वाळवण्यासाठी जी दोरी लावली होती तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला.

कपडे वाळवण्याच्या दोरीवर वाळवायला ठेवलेला बनियनचा तो आधार घेत होता. पण या झोक्यात बाळ होते किंवा नाही हे दिसत नाही. कदाचित यात बाळ नसावे, कारण साप झोक्यावर चढला तेव्हा, त्याला वाचवायला कुणी समोर आलं नाही किंवा आरडाओरड झाली नाही, म्हणून बाळ त्यात नसावं.

मुंगूस विषारी सापालाही संपवतो

मुंगूस हा प्राणी खवळला की त्याच्या अंगावरचे केस ताठ होतात. या अवस्थेत हा प्राणी आकाराने मोठा दिसायला लागतो, त्याचे भक्ष्य हे लहान सस्तन प्राणी असतात, जसे उंदीर, साप, विंचू, बेडूक, कीटक, पक्षी किंवा त्यांची अंडी देखील तो फस्त करतो. जर तुमच्या घराजवळ कोंबड्या असतील आणि तिथे मुंगूस आढळला किंवा आला, तर कोंबड्यांची संख्या वेगाने कमी होते. कारण एक एक कोंबडी तो फस्त करतो.

मुंगूस हा अतिशय चपळ, अतिशय सावध असणारा आणि धीट दिसणारा प्राणी आहे. तो आपल्या भक्ष्याचा जमीनीवर पाठलाग करुनच त्याला तिथेच हेरतो. यापुढेही जावून मुंगूस एवढा सहज भक्ष्य सोडून देणारा प्राणी नाहीय, कारण भक्ष्य बिळात जावून बसलं असेल, तर त्याच्या अतिशय तीक्ष्ण नखांनी तो बीळ उकरुन काढतो. मुंगूस हा बिळात जावून सहज माती उकरु शकतो, त्याचे कानही लहान असतात, त्याच्या झापड्या तो बंद करतो, त्यामुळे त्याच्या कानात, तो बिळात गेला तरी माती जात नाही.

मंगूस या प्राण्याला सर्वात जास्त आवडतो तो साप. विषारी सापही तो सोडत नाही. सापाचे तोंड धरुन त्याची काही क्षणात तो कवटी फोडतो एवढा मुंगूस चपळ असतो. असे करताना सापाचा विषारी दात आपल्याला लागणार नाही, याची त्याने पुरेपूर काळजी घेतलेली असते. सापाचे विष मुंगूस प्राण्याला घातक नसते असं म्हटलं जातं, पण याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

जमेका आणि मार्तीनीक या देशात व्हायपर या विषारी जातीच्या सापांचा नाश करण्यासाठी मुंगूसचा वापर झाला, कारण मुंगूस साप मारण्यात पटाईत आहे, या साठी आरोपंक्टॅटस या जातीचे मुंगूस सोडले. तेथे या मुंगसाने तिथले साप तर संपवले पण मोठ्या प्रमाणात कोंबड्याही फस्त केल्या. तेव्हा मुंगूस कसे कमी करता येतील याच्या उपाय योजना देखील कराव्या लागल्या.