Mumbai Rain Update : मुंबईत पावसाच्या मुसळधार सरी, अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता

| Updated on: Aug 27, 2023 | 10:30 AM

सकाळपासून मुंबईत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. मुंबईच्या अनेक भागात कालपासून चांगला पाऊस होत आहे, परंतु आज सकाळपासून पावसाचा जोर चांगलाचं वाढला असल्याचं पाहायला मिळत आहे.

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाच्या मुसळधार सरी, अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता
Follow us on

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातून अचानक पाऊस (Heavy rain in mumbai) गायब झाला होता. त्यामुळं महाराष्ट्रातील (maharashtra rain update) सगळे शेतकरी चिंता व्यक्त करीत होते. पावसाची गरज असताना पाऊस गायब झाल्यामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार (mumbai rain update) पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईत मागच्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सुरु झाला आहे. आज सकाळपासून मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे संपूर्ण मुंबईत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी प्रमाणात पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबईसह ठाण्यात सुध्दा मुसळधार पाऊस

पाऊस गायब झाल्यामुळे मुंबईत प्रचंड उकाडा जाणवत होता. मागच्या दोन दिवसापुर्वी पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पुढचे काही दिवस मुंबईत असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबईसह ठाण्यात सुध्दा मुसळधार पाऊस झाल्यामुळे काल रात्री रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

हे सुद्धा वाचा

कोकण पट्ट्यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ तासात मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकांनी गरज असल्यास बाहेर पडावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सकाळपासून सगळीकडं ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कोकण पट्ट्यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागच्या दोन दिवसांपासून कोकण विभागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.