जगप्रसिद्ध 105 फूट उंच हनुमान मूर्ती बघीतली का?, नांदुऱ्यातील या मूर्तीला चढवला दीड क्विंटल फुलांचा हार

| Updated on: Apr 06, 2023 | 10:20 AM

नांदुरा शहरात 2000 साली या 105 उंच हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली. 2003 मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उंच हनुमान मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.

जगप्रसिद्ध 105 फूट उंच हनुमान मूर्ती बघीतली का?, नांदुऱ्यातील या मूर्तीला चढवला दीड क्विंटल फुलांचा हार
Follow us on

बुलढाणा : देशात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतले जात आहेत. राज्यातील हनुमानं मंदिरांमध्ये भक्तीमय वातावरण पसरले आहे. कोट्यवधी हनुमान भक्त या जयंती कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत. नागपुरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सामूहिक हनुमान चालीसा, रामरक्षा पठण आणि सामूहिक आरती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोस्तव मंडळ महाल नागपूरच्या वतीने हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सामूहिक हनुमान चालीसा, रामरक्षा पठण, सामूहिक आरती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळेला महिलांनी आणि पुरुषांनी सामूहिक हनुमान चालीसा आणि सामूहिक आरती केली. मोठ्या प्रमाणात नागरिक देखील सहभागी झाले होते.

या रेकॉर्डमध्ये नोंद

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात 2000 साली या 105 उंच हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली. 2003 मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उंच हनुमान मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ वर्षांपासून ह्या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबवले जातात. हनुमान जयंतीला उंच मूर्तीवर तब्बल 5 क्विंटल वजनाचा फुलांचा हार चढवण्यात येत असतो.

हे सुद्धा वाचा

दीड क्विंटल फुलांचा हार

यंदा फुलांहा हार हा दीड क्विंटल चढण्यात आला आहे. गेल्या अडीच वर्षात कोरोनामुळे या जयंती उत्सवावर कोरोना निर्बंधानाच सावट होते. मात्र या वर्षी महाराष्ट्र कोरोनामुक्त असल्याने सर्व नियम शिथिल झाले आहेत. त्यामुळे बुलडाण्यात हनुमान जयंतीचा हा उत्सव थाटामाटात साजरा होताना पाहायला मिळत आहे.

शेजारी बालाजी मंदिराची स्थापना

गेल्या २००० मध्ये या महाकाय हनुमान मूर्तीची स्थापना नांदुरा येथील मोहनराव यांनी केली होती. या मूर्तीचे दुसरे विशिष्ट म्हणजे लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २००२ मध्ये देखील या मूर्तीची नोंद झाली आहे. शिवाय मूर्तीच्या शेजारीच बालाजी मंदिराचीसुद्धा स्थापना काही वर्षांपूर्वी या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी हनुमान जयंतीला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. उत्साह पाहायला मिळतोय.

जगातील सर्वांत उंच मूर्ती बघण्यासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. नांदुरा परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात या हनुमान मूर्तीची भक्तीभावाने पूजा करत आहेत.