नवी दिल्ली : दहशतवादी यासीनची पत्नी मुशाल हुसैन मलीकला पाकिस्तान पंतप्रधानांच्या सल्लागार बनवण्यात आले. पाकिस्तानचे केअरटेकर पीएम अनवार-उल हक काकड यांनी कॅबिनेटची घोषणा केली. मुशाल मलिक नेहमी दोन कारणांनी चर्चेत राहिल्या. पहिल्यांना भारताविरोधी वक्तव्य करून आणि दहशतवाद्याची पत्नी म्हणून. टेरर फंडिंग प्रकरणी गेल्या वर्षी मे महिन्यात फुटीरतावादी संघटन जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचे प्रमुख यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. पत्नी मुशान यांनी पतीचे समर्थन केले.
पाकिस्तानातील कराचीमधील श्रीमंत कुटुंबात मुशालचा जन्म झाला. यासीनसोबत मुशाल यांची पहिली भेट २००५ मध्ये झाली. ती अशी वेळी होती जेव्हा यासीन काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत होता. काश्मीरातील युवकांचा ब्रेन वॉश करत होता. २००५ मध्ये तो पाकिस्तानमध्ये पोहचला. काश्मीर पाकिस्तानमध्ये यावा, यासाठी यासीनने मिशन सुरू केले होते. या अभियानादरम्यान त्याने भाषण दिले होते.
यासीनने भाषणात फैज अहमद फेजची शायरी सांगितली. त्या कार्यक्रमात मुशाल आपल्या आईसोबत उपस्थित होती. यासीनच्या भाषणाने प्रभावित होऊन ती यासीनकडे ऑटोग्राफसाठी गेली आणि यासीनची प्रशंसा केली. दोघांच्या प्रेमप्रकरणाची सुरुवात येथूनच झाली. यासीनने मुशालला आपल्या आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले.
मुशालचे वडील एमए हुसैन अर्थशास्त्रज्ञ होते. आई रेहाना पाकिस्तानी मुस्लीम लीगची नेता होती. कित्तेक मोठ्या निर्णयास मुशाल सहभागी व्हायची. काही वर्षे दोघांची लव्ह स्टोरी सुरू होती. सौदी अरबच्या हज यात्रेत दोघेच्या आई एकमेकींना भेटल्या. त्यावेळी लग्नाबद्दल शिक्कामोर्तब झाले. २२ फेब्रुवारी २००९ रोजी पाकिस्तानमध्ये यासीन आणि मुशाल यांचे लग्न झाले. दोघांना एक मुलगी झाली. तिचं नाव रजिया सुल्तान ठेवण्यात आलं.
या लग्नाबद्दल पाकिस्तानात मोठा उत्साह होता. भारतात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. काही मीडिया एजन्सीने या लग्नाला गुप्तहेर एजंसीची योजना म्हटलं. भारत आणि पाकिस्तानच्या दुश्मनीमुळे हे लग्न किती काळ टिकेल, यासंदर्भात टीका केली जात होती.
मुशाल व्यवसायाने आर्टिस्ट आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनामिक्समधून पदवी घेतली आहे. पेंटिंगसह कविता लिहिणे पसंत करते. इस्लामाबादमध्ये राहणारी मुशाल पती यासीनच्या सुटकेसाठी सक्रिय आहे. त्यासाठी अभियान चालवत आहे. मुशााल यांना आता पाकिस्तानातील काळजीवाहू सरकारमध्ये सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. पाकिस्तानमध्ये यावरून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.