योगेश बोरसे, पुणे | 8 ऑगस्ट 2023 : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेण्यात येणारा सीए म्हणजेच सनदी लेखापाल परीक्षा निकाल जाहीर झाला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या या निकालात 24.98 टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेसाठी एक लाख 17 हजार 68 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये एक लाख तीन हजार 517 उमेदवारांनी परीक्षा दिली. ही परीक्षा 24, 26, 28 आणि 30 जून 2023 रोजी झाली होती. परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी 25 हजार 860 उमेदवार पास झाले आहेत.
सीए इंटरमीडीयट परीक्षेसाठी 2 ऑगस्ट 2023 रोजी अर्ज भरणे सुरु होणार होते. परंतु अद्याप ते सुरु झाले नाही. ही परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. आता आयसीएआयकडून लवकरच ही प्रक्रिया सुरु करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्या उमेदवारांना प्रत्येक विषयात 40 गुणांसह एकूण 50% मिळाले आहे, ते सीए फाउंडेशनच्या परीक्षेसाठी पात्र ठरतात. जे उमेदवार सीए फाउंडेशन परीक्षेत (CA Result 2023) एकूण 70% पेक्षा अधिक गुण मिळवतात ते “passed with distinction” म्हटले जातात.
जे उमेदवार सीए फाउंडेशन 2023 परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, ते पुढील टप्प्याची तयारी सुरु करु शकतात. जे उमेदवार जूनमधील परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांना ही परीक्षा परत द्यावी लागणार आहे. ही परीक्षा देशभरातील 500 केंद्रांवर घेतली जाते. ICAI या संस्थेकडून परीक्षा घेतली जाते. सर्वात कठीण प्रवर्गात ही परीक्षा ठेवली गेली आहे. यामुळे या परीक्षेचा निकाल कमी लागतो.