Pune News : घरात 25 लाख रुपये असल्याचे कळाले, मग मेहुणीने डॉक्टराचे केले अपहरण अन्…

| Updated on: Aug 26, 2023 | 12:51 PM

Pune News : पुणे शहरात अपहरणाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घरात पैसे असल्याचे कळाले मग बायकोच्या बहिणेने डॉक्टराचे अपहरण केले...पोलिसांच्या तपासात हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

Pune News : घरात 25 लाख रुपये असल्याचे कळाले, मग मेहुणीने डॉक्टराचे केले अपहरण अन्...
Crime News
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

पुणे | 26 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात एक डॉक्टराचे अपहरण झाले होते. पुणे परिसरातील भेकराईनगर येथील पशूवैद्यकीय डॉक्टरास फोन आला. कुत्रा आजारी असल्याचे सांगत उपचार करण्यासाठी वडकी येथील निर्जनस्थळी बोलावले. त्यानंतर गाडीत टाकून त्यांचे अपहरण केले. हा सर्व प्रकार करण्यामागे मास्टरमाइंड डॉक्टराची मेहुणीच निघाली. घरात 25 लाखांची रोकड असल्याचे समजल्यावर तिने काही साथीदारांना सोबत घेऊन हा प्लॅन तयार केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केलीय.

नेमका काय आहे प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील भेकराईनगर परिसरात राहणाऱ्या पशूवैद्यकीय डॉक्टरास 9 ऑगस्ट रोजी फोन आला. कुत्र्यावर उपचारासाठी वडकी येथे बोलवले. डॉक्टर त्या ठिकाणी गेल्यावर विनानंबरच्या गाडीत त्यांना कोंबण्यात आले. त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून घराची चावी घेतली. त्यानंतर घरात असलेले 25 लाखांची रोकड आणि सोने लुटून नेले. या प्रकरणी डॉक्टरांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली होती.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी सुरु केला तपास

तक्रार आल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला. या प्रकरणात मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर माऊली ऊर्फ ज्ञानदेव महादेव क्षीरसागर, राहुल दत्तू निकम (वय २७), नितीन बाळू जाधव (वय २५), सुहास साधू मारकड (वय २८), विद्या नितीन खळदकर (वय ३५) संतोष धोंडिबा गोंजारी ऊर्फ राणी पाटील (वय ३४) या सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून 22 लाख 55 हजाराची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले.

का केले अपहरण

डॉक्टरांचे पहिले लग्न झाले होते. त्यासंदर्भात घटस्फोटाचा खटला न्यायालयात गेला होता. न्यायालयाने पहिल्या पत्नीला 20 लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे डॉक्टरांनी पैसे जमवून घरात आणून ठेवले होते. त्या दरम्यान त्यांची दुसरी पत्नी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीला गेली होती. घरात मोठी रक्कम असल्याचा प्रकार डॉक्टराच्या मेहुणीला समजला. मग तिनेच इतर साथीदारांच्या मदतीने डॉक्टरांचे अपहरण करुन घरातील रोकड आणि दागिने लुटून नेले. पोलिसांच्या तपासातून हा प्रकार समोर आला. यामुळे घरभेदी सापडला.