त्यांना स्वर्गात येशूला भेटायचं होतं, त्यासाठी त्यांनी निवडला अघोरी मार्ग, मग पोलिसांनी…

| Updated on: Apr 24, 2023 | 8:44 PM

ज्या फादरने त्या कुटुंबाला, गावकऱ्यांना उपदेश दिला त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र, त्या फादरने आपण त्यांना केवळ मार्ग दाखविला. बाकीचे त्यांनी केले असे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला.

त्यांना स्वर्गात येशूला भेटायचं होतं, त्यासाठी त्यांनी निवडला अघोरी मार्ग, मग पोलिसांनी...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

केनिया : आफ्रिकन देश केनियामध्ये एका ख्रिश्चन धर्मगुरूने एका कुटूंबासह काहींना तुम्हाला येशूला भेटायचं आहे तर हा उपाय करा असा उपदेश दिला. त्या फादरने दिलेला उपदेश हा आदेश मानून त्यांनी त्या अघोरी मार्ग निवडला. ही घटना उघडकीस आली आणि पोलिसांनाही ते भयानक दृष्य पाहून अक्षरशः घाम फुटला. ज्या फादरने त्या कुटुंबाला, गावकऱ्यांना उपदेश दिला त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र, त्या फादरने आपण त्यांना केवळ मार्ग दाखविला. बाकीचे त्यांनी केले असे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला अटक करून त्याला जामिनावर सोडण्यासही नकार दिला आहे.

येशूला भेटायचेच असा ध्यास घेऊन किल्फी प्रांतातील काही जणांनी गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चचे पाद्री पाद्री पॉल मॅकेन्झी याची भेट घेतली. या पाद्रीने तुम्हाला येशूला भेटायचे असेल तर त्यांनी उपाशी राहून स्वतःला पुरून घेतले तर ते येशूला भेटतील आणि स्वर्गात जातील असा सल्ला दिला.

हे सुद्धा वाचा

ख्रिश्चन धर्मगुरूच्या सांगण्यावरून 29 जणांनी स्वतःला किल्फी प्रांतातील शाकाहोला जंगलामध्ये स्वतःला पुरून घेतले. मात्र काही दिवस उलटल्यानंतर दुर्गंधी पसरल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दुर्गंधी पसरलेल्या भागात खोदायला सुरवात केली. तेव्हा त्यांचा हाती एक एक मृतदेह लागला.

गेले तीन दिवसांपासून पोलीस या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम करत आहेत. पोलिसांना आतापर्यंत 65 कबरी सापडल्या असून यातील लोकांना बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरूच आहे. त्या पाद्रीच्या सांगण्यावरून या लोकांनी उपाशीपोटी सामूहिक आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अजूनही कोणीतरी जिवंत असेल या आशेने पोलीस कबर खोदत आहेत. त्यामुळे येथे शोधकाम सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांना आतापर्यंत काही जणांचे हात, काहींच्या शरीराचे अन्य अवयव तुटलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा नेमका किती याचा अंदाज पोलिसांनाही लावता आलेला नाही. यामृतांमध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे.

एका कबरीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जण

पोलिसांनी एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आहे. या सर्वाना कुटुंबासह एकत्र येशूला भेटायचे होते. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

पाद्री म्हणतो मी निर्दोष

तपासादरम्यान पोलिसांना गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चच्या पाद्री पाद्री पॉल मॅकेन्झी याची माहिती मिळाली. त्याची चौकशी केली असता त्याने आपले चर्च 2019 पासून बंद असल्याचे सांगितले. मी कोणासही आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही, असे तो सतत सांगत आहे.

पोलिस तपासणीत त्या पाद्रीचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला जामिनावर सोडण्यासही नकार दिला आहे. दरम्यान, पोलीस सर्व मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा करत आहेत. जेणेकरून लोक उपासमारीने मरण पावले हे सिद्ध करता येईल.

यापूर्वीही घेतला होता दोन मुलांचा जीव

पाद्री पॉल मॅकेन्झी याच्यामुळे पूर्वीही दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्या मुलांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याला 10,000 केनियन शिलिंग म्हणजेच 6,000 रुपयांच्या दंडावर सोडण्यात आले होते.