पत्नीशी झाला होता वाद, बदला घेण्यासाठी रचला भयानक कट ; बेडरूममध्ये लावला CCTV आणि ‘तो’ व्हिडीओ…

| Updated on: Sep 13, 2023 | 12:56 PM

पीडित महिला व तिच्या पती दरम्यान मतभेद होते. काही महिन्यांपूर्वी समेट होऊन ते एकत्र राहू लागले. पण पतीच्या मनात अजूनही पत्नीबद्दल राग होता. तिचा बदला घेण्यासाठी त्याने थेट...

पत्नीशी झाला होता वाद, बदला घेण्यासाठी रचला भयानक कट ; बेडरूममध्ये लावला  CCTV आणि तो व्हिडीओ...
Follow us on

भोपाळ | 29 ऑगस्ट 2023 : पती-पत्नीचं नातं जन्मोजन्मीचं असतं अस म्हणतात. पण कोणत्याही नात्यात विश्वास (trust) महत्वाचा असतो. त्या विश्वासाला तडा गेला की काही हातात उरत नाही. अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे, जिथे पतीने पत्नीवर सूड उगवण्यासाठी असे लाजिरवाणे कृत्य केले, ज्याची कोणीच कल्पना देखील करू शकणार नाही. पतीने त्याच्या पत्नीचे खासगी व्हिडीओ व्हायरल (viral video) केले. बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावून त्याने रेकॉर्डिंग केले होते. हे समजताच पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेशातील खांडवा येथे ही लाजिरवाणी घटना घडली.

पत्नीशी मतभेद झाल्याने पतीने हे किळसवाणे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी त्याने बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केले. हैराण करणारी गोष्ट म्हणजे तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने हे व्हिडीओ त्याचे सासरे आणि मेव्हण्याच्या मोबाईलवरही पाठवले. हे संपूर्ण प्रकरण खांडवा जिल्ह्यातील इनपुन गावातील आहे. तेथे राहणारी महिला पतीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आली होती, असे पोलिसांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी पती आपला छळ करत असल्याचे तिने नमूद केले, मात्र काही दिवसांनी त्यांच्यात समेट झाला आणइ ते दोघे पुन्हा एकत्र राहू लागल.

सीसीटीव्ही लावून रेकॉर्ड केले ते क्षण

त्यावेळी तिच्या पतीने घरात सीसीटीव्ही लावून घेतले. थोड्या दिवसांनी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याने पीडित महिला माहेरी गेली. तेव्हा तिच्या पतीने तिचे खासगी व्हिडीओ व्हायरल केले. पीडितेचे वडी, भाऊ आणि कुटुंबातील अन्य सदस्यांच्या मोबाईलवरही त्याने ते व्हिडीओ पाठवले. पत्नीवर सूड उगवण्यासाठी त्याने हे कृत्य केले. अखेर पीडितेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.