सन्मान सोहळ्यासाठी नगरहून पुण्यात आली, मग अचानक बेपत्ता झाली, पोलीस तपासात जे समोर आलं ते पाहून घरच्यांना धक्काच बसला !

| Updated on: Jun 19, 2023 | 2:17 PM

एमपीएससीचं स्वप्न पूर्ण केलं. चांगला रँक मिळवला. यानंतर सत्कार समारंभासाठी नगरहून पुण्याला आली. मग दोन दिवसांनी बेपत्ताच झाली.

सन्मान सोहळ्यासाठी नगरहून पुण्यात आली, मग अचानक बेपत्ता झाली, पोलीस तपासात जे समोर आलं ते पाहून घरच्यांना धक्काच बसला !
बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला
Follow us on

पुणे : एमपीएससीची परीक्षा चांगल्या रँकने पास झाली. यानंतर ती एका सन्मान सोहळ्यासाठी नगरहून पुण्याला आली. मात्र घरी परतलीच नाही. तिचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने तिच्या वडिलांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली. पोलिसांनी बेपत्ता तरुणीचा शोध सुरु केला असता धक्कादायक माहिती समोर आली. तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पुण्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ आढळला. तरुणीची हत्या कोणत्या कारणातून आणि का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. सिंहगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सत्कार सोहळ्यासाठी पुण्यात आली आणि बेपत्ता झाली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी 9 जून रोजी एका सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी पुण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ती नेर्हे परिसरातील तिच्या मैत्रिणीकडे आली आणि दुसऱ्या दिवशी सिंहगड किल्ल्यावर जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली. मात्र ती घरी परतली नाही म्हणून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन लागला नाही, त्यामुळे वडील चिंतेत होते. मुलीचा इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला.

तरुणीसोबत गेलेला तरुण अद्याप बेपत्ता

यावेळी शहरातील वारजे परिसरातून पीडित कुटुंबातील एक युवकही बेपत्ता झाल्याचे आढळून आले असून, दोघेही एकत्र असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तरुणीचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला आहे. ज्या तरुणासोबत जात असल्याचे तिने सांगितले होते, तो अद्याप सापडला नाही. तांत्रिक माहितीनुसार, त्याचे शेवटचे लोकेशन चंदीगड होते, तेथे एटीएममधून त्याने 1,000 रुपये काढले. तो ही एमपीएससीची तयारी करत होता. तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण समजेल.

हे सुद्धा वाचा