मौजमज्जा करण्यासाठी ओला चालकाला लुटायचे, एकाला अटक, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

| Updated on: Jun 23, 2023 | 6:27 PM

त्याने पॅसेंजरला इच्छित स्थळी सोडलं अन् थकवा दूर करण्यासाठी थोडी विश्रांती घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबला. पण त्याला कुठं माहित होतं, ते घात लावून बसले होते.

मौजमज्जा करण्यासाठी ओला चालकाला लुटायचे, एकाला अटक, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
ओला चालकाला लुटणारा एक आरोपी अटक
Image Credit source: TV9
Follow us on

उल्हासनगर : मौजमजा आणि शो-शाईनिंगसाठी हल्लीची तरुणाई कोणत्या थराला जाईल हे सांगणे कठिण आहे. केवळ पोलिसांच्याच नाही पालकांच्याही डोक्याला तरुणाईने ताप केला आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. मग ऐन उमेदीच्या काळात तुरंगात जाण्याची वेळ येते. अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. मौजमजा करण्यासाछी तीन तरुणांनी एका ओला चालकाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन दिवसात उल्हासनगर क्राईम ब्रांचने तपास करत एका आरोपीला अटक केली आहे. अन्य दोघांचा शोध सुरु आहे.

विश्रांतीसाठी थांबला चालक

अंबरनाथ पूर्व आनंदनगर एमआयडीसी परिसरात मंगळवारी ही घटना घडली. ओला चालक कमलाकर माने याने बदलापूर येथील पॅसेंजरला सोडले. त्यानंतर महामार्गावरील कटाई रोडजवळ म्हाडा सर्कलमध्ये थोडी विश्रांती मिळावी म्हणून थांबला होता. मात्र याच वेळी तीन अज्ञात तरुण बाईकवरुन आले. त्यांनी कमलाकर याच्या गाडीची काच फोडून धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. कमलाकरला जखमी करुन त्याच्याकडील रोकड आणि मोबाईल लुटून चोरटे पसार झाले.

एका आरोपीला अटक, दोघे फरार

या प्रकरणी अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास शिवाजी नगर पोलीस आणि उल्हासनगर क्राईम ब्रांच करत होते. यावेळी उल्हासनगर पोलिसांना एक आरोपी परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला अटक केली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्हाची कबुली देत केवळ मौजमजेसाठी आपण ही लूट केल्याचे त्याने सांगितले. अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहे.

हे सुद्धा वाचा