Multibagger Stock : अरे सूसाटच! गुंतवणूकदार लवकरच होतील करोडपती,कोणती आहे ही कंपनी

| Updated on: Aug 25, 2023 | 8:58 AM

Multibagger Stock : हा मल्टिबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांना लॉटरी लावणार आहे. या स्टॉकने घेतलेली झेप थक्क करणारी आहे. तीन वर्षांपूर्वी 155 रुपयांवर असलेला हा स्टॉक आता 8 पटीने वाढला आहे. या स्टॉकने अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आता या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्याने गुंतवणूकदारांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे.

Multibagger Stock : अरे सूसाटच! गुंतवणूकदार लवकरच होतील करोडपती,कोणती आहे ही कंपनी
Follow us on

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात (Share Market) योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे सर्वात महत्वाचे असते. त्यासाठी कंपनीचा, बाजाराचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा असतो. कमी भांडवल असलेल्या काही कंपन्यांची झेप थक्क करणारी असते. योग्य वेळी गुंतवणूक केल्यास दीर्घकाळानंतर गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. एअरोस्पेस, डिफेंस अँड स्पेस तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात नावारुपाला आलेल्या या कंपनीने अशीच गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे. अवघ्या तीन वर्षांत या स्टॉकने (Multibagger Stock) गगनभरारी घेतली आहे. 155 रुपयांवर असलेला हा स्टॉक आता 8 पटीने वाढला आहे. आता या कंपनीला 117 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याने गुंतवणूकदारांना (Investors) आनंदाच्या उकळ्या फुटत आहे.

Sika Interplant

सिका इंटरप्लांट सिस्टम्स लिमिटेड या कंपनीने ही कामगिरी बजावली आहे. या कंपनीच्या स्टॉकमध्ये जवळपास 5 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या पाच दिवसांत तर या शेअरने गुंतवणूकदारांना 10.28 टक्के आणि एका महिन्यात 65 टक्के इतका बंपर परतावा दिला आहे. सिका इंटरप्लांट सिस्टम्स लिमिटेडचा शेअर 58 रुपयांनी वधारुन 1217 रुपयांवर पोहचला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे वारे न्यारे झाले आहे.

हे सुद्धा वाचा

शेअरचा चढता आलेख

सिका इंटरप्लांट सिस्टम्स लिमिटेडचा शेअरने 10.28 टक्क्यांची उसळी घेतल्याने गुंतवणूकदार खुशीत आहे. एका महिन्यात शेअरने 65 टक्के परतावा दिला. गेल्या 6 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करुन दिली. या शेअरने 500 रुपयांच्या निच्चांकी पाताळीवरुन 118 टक्के तेजीसह 1217 रुपयांवर पोहचला.

इतके आहे मार्केट कॅप

Sika Interplant सिस्टम्स लिमिटेडचे 516 कोटी रुपयांचे मार्केट कॅप आहे. या कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला. गेल्या एका वर्षांत सिकाच्या शेअरने गुंतवणूकदारांना 75 टक्के, तर गेल्या 5 वर्षांत 700 टक्के रिटर्न देऊन मालामाल केले आहे. सिका इंटरप्लांट सिस्टम्सचा शेअर 24 जुलै 2020 रोजी 155 रुपयांच्या निच्चांकी स्तरावर होता. आता त्याने 8 पट झेप घेतली आहे. हा शेअर 1217 रुपयांवर होता.

वळवला मोर्चा

सिका इंटरप्लांट सिस्टम्सच्या शेअरने गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांची चांदी केली आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जोरदार परतावा दिला आहे. या कंपनीला व्यावसायिक उलाढालीतून 5 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे.

मिळाली मोठी ऑर्डर

कंपनीला अडवांस इंजिनिअरिंग प्रोडक्टस अँड सर्व्हिसेजसाठी 117 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. सिका इंटरप्लांट सिस्टम्स ही एक इंजिनिअरिंग कंपनी आहे. ही कंपनी एअरोस्पेस, डिफेंस अँड स्पेस, ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेजमध्ये काम करते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.