Multibagger Share : 3 रुपयाच्या शेअरची कमाल, 10 वर्षांत कोट्यवधींची कमाई!

| Updated on: Aug 19, 2023 | 5:35 PM

Multibagger Share : शेअर बाजारात अनेक मल्टिबॅगर स्टॉक आहेत. त्यातील या स्टॉकने दहा वर्षांतच गुंतवणूकदारांना लॉटरी लावली. ज्यांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली, त्यांना आता मोठा परतावा मिळाला आहे.

Multibagger Share : 3 रुपयाच्या शेअरची कमाल, 10 वर्षांत कोट्यवधींची कमाई!
Follow us on

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात (Share Market) अनेक मल्टिबॅगर स्टॉक आहेत. त्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. अनेक कंपन्या चांगली वृद्धी करत आहे. त्यांचा व्यवसाय वाढत आहे. काहींना मोठे कंत्राट मिळत आहे. त्यातून त्यांना फायदा होत आहे. अशीच ही एक कंपनी आहे. या कंपनीने मोठा पल्ला गाठला आहे. या कंपनीच्या शेअरने पण लांब उडी घेतली आहे. दहा वर्षांपूर्वी हा शेअर अवघ्या 3 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीला होता. या शेअरने गुंतवणूकदारांना धमाकेदार रिटर्न (Return) दिले. शेअर बाजारात येत्या काही काळात हा शेअर तेजीत येऊ शकतो. गेल्या काही महिन्यात या शेअरने मोठी धाव घेतली आहे. दहा वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत हजार रुपयांच्या पण पुढे गेली आहे. त्यामुळे ज्यांनी अगोदर गुंतवणूक केली, ते आजा कोट्याधीश झाले आहेत.

हा आहे तो शेअर

Tanla Platforms असे या शेअरचे नाव आहे. या कंपनीने मोठा पल्ला गाठला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या 10 वर्षांत धमाकेदार रिटर्न दिले आहे. या शेअरचा भाव 3 रुपयांपेक्षा पण कमी कमी आहे. आता या कंपनीच्या शेअरने 1100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इतकी मोठी झेप घेतल्याने सुरुवातीला गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता कोट्याधीश झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

शेअर एकदम तेजीत

2 ऑगस्ट 2013 रोजी एनएसईवर Tanla Platforms वर हा शेअर 2.75 रुपये होता. आता या शेअरची किंमत 1000 रुपये आहे. केवळ 10 वर्षांत या शेअरने मोठा पल्ला गाठला आहे. गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन दिली आहे. वर्ष 2020 मध्ये हा शेअर 100 रुपयांवर होता. त्यानंतर हा शेअर सूसाट झाला. त्याने त्याच वर्षी 600 रुपयांचा टप्पा गाठला. 18 ऑगस्ट 2023 रोजी या शेअरने एनएसईवर 1101 रुपयांचा टप्पा गाठला.

गुंतवणूकदार एकदम मालामाल

या कंपनीचा शेअर एनएसईवर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 1317.95 रुपयांवर पोहचला. या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 493 रुपये आहे. 2013 मध्ये हा शेअर 3 रुपयांवर होता. त्यावेळी एखाद्या गुंतवणूकदाराने 3 लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्याकडे एक लाख शेअर असते. आताच्या 1100 रुपयांच्या भावाचा विचार करता आता या 1 लाख शेअरची किंमत 11 कोटी रुपये असती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.