नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : शेअर बाजारात पेनी स्टॉक हा रिस्की मामला आहे. पण ‘रिस्क है तो इश्क है’, असे म्हणतात. पेनी स्टॉक हा शेअर बाजारातील ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ आहेत. या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना तगडे रिटर्न दिले आहे. Servotech Power कंपनीच्या या पेनी स्टॉकने अवघ्या दोनच वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले. स्मॉल कॅप मल्टिबॅगर स्टॉकने (Multibagger Penny Stock) गेल्या दोनच वर्षात 3300 टक्के रिटर्न दिला आहे. दोन वर्षांपूर्वी गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 34 लाख रुपये मिळाले असते. पण मल्टिबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे मानण्यात येते. कंपनीच्या योग्य अभ्यासाशिवाय गुंतवणूक करणे आर्थिक फटका देणारे ठरु शकते.
अशी झाली वाढ
सर्वोटेक पॉवर शेअर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 83 रुपयांहून 86 रुपये प्रति शेअरवर पोहचला. गुंतवणूकदारांना या स्टॉकने तीन टक्के परतावा दिला आहे. सहा महिन्यात या मल्टिबॅगर पेनी स्टॉकने 20.65 रुपये प्रति शेअरवरुन थेट 86 रुपये प्रति शेअरची मोठी झेप घेतली. या दरम्यान स्टॉकमध्ये 430 टक्क्यांचा परतावा मिळाला.
दोन वर्षांत रेकॉर्ड
एक वर्षापूर्वी हा स्मॉल कॅप स्टॉक 6 रुपये प्रति शेअर होता. यादरम्यान हा शेअर 1300 टक्के परतावा दिला. दोन वर्षांपूर्वी तर हा स्टॉक अत्यंत स्वस्त होता. त्यावेळी तो 2.50 रुपये प्रति शेअर होता. या दोन वर्षात हा शेअर 3300 टक्क्यांनी वधारला. या स्टॉकने गुंतवणूकदारांन मोठा परतावा दिला.
गुंतवणूकदार झाले मालामाल
सर्वोटेक पॉवर शेअरचा इतिहासावर नजर टाकली तर या शेअरचा चढता आलेख दिसून येतो. एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर एक लाख रुपयांचे आता 1.03 लाख रुपये झाले असते. सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते. तर गुंतवणूकदारांना 4 लाख रुपये परतावा मिळाला असता. तर या वर्षाच्या सुरुवातीला, गुंतवणूक केली असती तरी आता 5.30 लाख रुपये रिटर्न आला असता.
दोन वर्षात मोठा फायदा
एक वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत 14 लाख रुपये झाली असती. दोन वर्षांपूर्वी हा स्टॉक 2.5 रुपये प्रति शेअर होता. त्यावेळी एक लाख रुपये गुंतवले असते तर आज गुंतवणूकदारांना 34 लाख रुपये मिळाले असते.
काय करते ही कंपनी
सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीने उत्तर प्रदेश सरकारसोबत एक करार केला. कंपनी राज्यात ईव्ही चार्जर प्लॅँट टाकणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकार कंपनीला पाठबळ देणार आहे. याविषयीच्या एमओयूनुसार सर्वोटेक या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात कंपनी जवळपास 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्लँटमुळे 500 हून अधिक जणांना रोजगार मिळणार आहे. 2025 पर्यंत ही कंपनी उत्पादन सुरु करेल. 10 हजार फास्ट चार्जिंग सुरु करण्याची ही योजना आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.