Gautam Adani : एका झटक्यात कमावले इतके हजार कोटी! वरचढ ठरले गौतम अदानी

| Updated on: Aug 19, 2023 | 3:45 PM

Gautam Adani : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गचे हल्ले सुरुच आहे. पण नवनवीन साथीदार पण त्यांना मिळत आहे. आता तर त्यांनी कमाईत षटकार ठोकला आहे. एका झटक्यात त्यांनी इतके हजार कोटी कमावले आहेत.

Gautam Adani : एका झटक्यात कमावले इतके हजार कोटी! वरचढ ठरले गौतम अदानी
Follow us on

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : अदानी समूहाचे (Adani Group) चेअरमन गौतम अडानी (Gautam Adani) यांना अनेक दिवसानंतर जोरदार बातमी मिळाली. या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात, शुक्रवारी त्यांच्या सूचीबद्ध दाह कंपन्यांच्या शेअरमध्ये एकदत तेजी आली. गौतम अदानी यांचे पाचही बोटं शुक्रवारी तुपात होती. त्यांनी छप्परफाड कमाई केली. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, शुक्रवारी त्यांची एकूण संपत्ती 2.92 अब्ज डॉलरने उसळली. अदानी शुक्रवारी जगातील सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश ठरले. या कमाईमुळे त्यांनी श्रीमंतांच्या यादीत दोन क्रमांकाची आगेकूच केली. ते टॉप 20 क्लबमध्ये दाखल झाले. जगातील टॉप 10 श्रीमंतापैकी 9 जणांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली.

इतकी केली कमाई

गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर शुक्रवारी तेजीत होते. त्याचा फायदा त्यांना झाला. या शेअरने जोरदार उसळी घेतली. त्यांची एकूण संपत्ती 2.92 अब्ज डॉलरने वधारली. भारतीय चलनात ही कमाई 24,281 कोटी रुपये होती. हिंडनबर्गचा अहवाल एकप्रकारे अदानी यांच्या पथ्यावर तर पडत नाही ना, अशी पण चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

एका रिपोर्टने शेअर तेजीत

अदानी ग्रुपमधील शेअरच्या तेजीला एक रिपोर्ट कारणीभूत ठरला. आबुधाबी येथील नॅशनल एनर्जी कंपनी PJSC (TAQA) अदानी समूहात 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणारा असल्याचा दावा बातमीत करण्यात आला होता. या वृत्ताचा सकारात्मक परिणाम झाला. शेअर एकदम उसळले. अदानी समूहातील काही शेअरनी रॉकेट भरारी घेतली. काही शेअर 12 टक्क्यांनी वधारले.

या तर हवेतील बाता

अदानी समूहाने या वृत्ताचे खंडन केले. TAQA सोबत कुठल्याच प्रकारची चर्चा सुरु नसल्याचे त्यांनी सांगितले. पण तोपर्यंत या वृत्ताने त्याचा परिणाम दाखवला होता. या चर्चेमुळे अदानी समूहाचे बाजारातील भांडवल 11 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. फेब्रुवारीनंतर पहिल्यांदा अशी घडामोड घडली. मात्र अमेरिकेतील अग्रवाल यांच्या फर्मने अदानी समूहात मोठी गुंतवणूक केली आहे. हा समूह सातत्याने गुंतवणूक करत आहे. त्याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे.

टॉप 20 मध्ये अदानी

अदानी 63.8 अब्ज डॉलरच्या नेटवर्थ सह जगातील श्रीमंतांच्या यादीत 20 व्या क्रमांकावर पोहचले. आशियात रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यानंतर त्यांचा क्रमांक आहे. चीन के झोंग शॅनशॅन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शुक्रवारी त्यांच्या नेटवर्थमध्ये 1.05 अब्ज डॉलरची घसरण आली. हिंडनबर्ग अहवालापूर्वी अदानी जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहचले होते. या अहवालाने त्यांचे नुकसान केले. या वर्षात त्यांनी 56.7 अब्ज डॉलर गमावले.