Defense Stock : डिफेंस स्टॉक भिडला गगनाला, गुंतवणूकदारांना मोठा फायदा

| Updated on: Aug 25, 2023 | 4:42 PM

Defense Stock : संरक्षण क्षेत्रातील या कंपनीच्या शेअरने अनेक गुंतवणूकदारांना मालमाल केले. 4 रुपयांचा डिफेंस स्टॉक आता हजार रुपयांच्या घरात पोहचला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी 2.81 टक्के तेजी आली. हा शेअर आता 1006.70 वर बंद झाला.

Defense Stock : डिफेंस स्टॉक भिडला गगनाला, गुंतवणूकदारांना मोठा फायदा
Follow us on

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : संरक्षण क्षेत्रातील कंपनी भारत फोर्ज लिमिटेडच्या शेअरने (Bharat Forge Share) मोठा फायदा मिळवून दिला. या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. हा शेअर आता एक हजारांच्या पुढे पोहचला आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 2.81 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर आता 1006.70 वर बंद झाला. काही वर्षांपूर्वी हा शेअर केवळ 4 रुपयांवर होता. सध्या या कंपनीचा स्टॉक त्याच्या उच्चांकावर पोहचला आहे. सलग तिसऱ्या व्यापारी सत्रात या शेअरमध्ये मोठी उलथापालथ आणि तेजी दिसून आली. इतर अनेक शेअरप्रमाणे या स्टॉकने सुद्धा मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा (Investors) मोठा फायदा झाला आहे.

अशी घेतली भरारी

डिसेंबर 1998 साली भारत फोर्ज कंपनीचा एक शेअर केवळ 4 रुपयांना होता. तेव्हापासून कंपनीची घौडदौड सुरु आहे. या शेअरमध्ये 225 पट तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 2020 साली तेजी दिसून आली. या वर्षी सुद्धा या शेअरने मोठी कामगिरी बजावली. आतापर्यंत या स्टॉकने 13 टक्क्यांची वाढ नोंदवली. 2022 मध्ये संरक्षण क्षेत्रातील या स्टॉकने 33 टक्के परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनी कशामुळे चर्चेत

Bharat Forge ची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटजिक सिस्टम्सला 850 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. हे वृत्त येऊन धडकताच भारत फोर्जचा शेअर वधारला. या स्टॉकने मोठी उसळी घेतली. कंपनीला ही ऑर्डर येत्या 18 महिन्यात पूर्ण करायची आहे. सध्या भारत फोर्जकडे जवळपास 2200 कोटींचे काम आहे. आतापर्यंत या स्टॉकने 13 टक्क्यांची वाढ नोंदवली. 2022 मध्ये संरक्षण क्षेत्रातील या स्टॉकने 33 टक्के परतावा दिला. हा शेअर आता 1006.70 वर बंद झाला.

चांद्रयान मोहिमेशी संबंधित स्टॉक वधारले

चंद्रयान मोहिमेत सहभागी सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरने 14.91 टक्क्यांची उसळी घेतली होती. पारस डिफेंस अँड स्पेस टेक्नॉलॉजीच्या शेअर 5.47 टक्क्यांनी वधारला होता.एमटीएआर टेक्नोलॉजीजच्या शेअरने 4.84 टक्क्यांची सलामी दिली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरमध्ये 3.57 टक्क्यांची तेजी दिसून आली होती. संरक्षण क्षेत्राशी संबंधित भारत फोर्ज कंपनीचा शेअर 2.82 टक्क्यांनी वधारला होता. अस्त्रा मायक्रोव्हेव प्रोडक्ट्स कंपनीचा शेअर 1.72 टक्क्यांनी वाढला तर लार्सन अँड टुब्रोच्या शेअरमध्ये 1.42 टक्क्यांची तेजी आली होती.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.