त्रिपुरा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting

 

त्रिपुरा पूर्वोत्तर भारतातील एक महत्त्वाचं राज्य आहे. या राज्याला बोडो लोकांचं प्राचीन घरही म्हटलं जातं. पूर्वेकडील सेव्हन सिस्टर्स राज्यांमध्ये त्रिपुराही येते. त्रिपुराचं भौगौलिक क्षेत्र 10, 491 वर्ग किलोमीटर विस्तारलेलं आहे. या राज्याच्या बाजूला बांगलादेशाची सीमा आहे. आसाम आणि मिझोराम राज्याच्या सीमाही लागून आहेत. राज्यातील अर्ध्याहून अधिक भाग जंगलांनी व्यापलेला आहे. राज्याचा 56.52 टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. 15 ऑक्टोबर 1949ला त्रिपुरा स्वतंत्र संस्थान बनला. त्यानंतर त्रिपुराचा भारतीय संघ राज्यात समावेश झाला. 1956 मध्ये राज्य पुनर्गठण झाल्यानंतर त्रिपुरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित झाला. त्यानंतर 1972मध्ये राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. त्रिपुरात लोकसभेच्या दोन जागा आहे. राज्यात भाजपचं सरकार आहे.

त्रिपुरा लोकसभा मतदारसंघाची यादी

राज्य जागा उमेदवार वोट पक्ष स्टेटस
Tripura Tripura East MAHARANI KRITI SINGH DEBBARMA - BJP Won
Tripura Tripura West BIPLAB KUMAR DEB - BJP Won

त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य आहे. याला बोडो लोकांचे प्राचीन घर असेही म्हणतात आणि त्याच्या एका टोकाला बांगलादेश आहे. ईशान्य भारतात, ज्यांना 'सेव्हन सिस्टर्स' म्हणतात त्या सात राज्यांमध्ये त्याचा समावेश होतो. आसाम, नागालँड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा ही सात भगिनी राज्ये आहेत. हे राज्य 10,491 चौरस किमी परिसरात पसरले आहे.

त्रिपुरा हे म्यानमार आणि बांगलादेशच्या नदी खोऱ्यांमध्ये वसलेले आहे. ते तीन बाजूंनी बांगलादेशने वेढलेले आहे, तर पूर्वेला आसाम आणि मिझोरामला जोडलेले आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक भाग जंगलांनी व्यापलेला आहे (56.52 टक्के). आगरतळा ही त्रिपुराची राजधानी आहे. त्रिपुरी आणि बंगाली या येथील मुख्य भाषा आहेत. 1956 मध्ये ते भारतीय प्रजासत्ताकचा एक भाग बनले आणि 1972 मध्ये ते भारतीय राज्य बनले. त्रिपुरामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपने येथे आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले होते.

प्रश्न- त्रिपुरामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत?
उत्तर – 2

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये एकूण मतदानाची टक्केवारी किती होती?
उत्तर – 82.40%

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्रिपुरातील दोन्ही जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या?
उत्तर - भारतीय जनता पार्टी

प्रश्न- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्रिपुरातील दोन्ही जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या?
उत्तर - सीपीआय-एम

प्रश्न- 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्रिपुरामध्ये किती जागा जिंकल्या?
उत्तर - 32

प्रश्न- 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपची कामगिरी कशी होती?
उत्तरः तेव्हा भाजपने 60 पैकी 36 जागा जिंकल्या होत्या.

प्रश्न- 2023 च्या निवडणुकीत भाजप नंतर कोणता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता?
उत्तरः सीपीआय-एमने 11 जागा जिंकल्या होत्या.

प्रश्न- त्रिपुरामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA विरुद्ध कोणती आघाडी आहे?

उत्तर - धर्मनिरपेक्ष लोकशाही शक्ती

प्रश्न- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA ला किती जागा मिळाल्या?
उत्तर - 0

प्रश्न- केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघातून खासदार आहेत?
उत्तर - त्रिपुरा पश्चिम लोकसभा जागा