ओडिशा लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting
ओडिशाला धार्मिक नगरीही म्हटलं जातं. नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज यामुळे ओडिशा प्रसिद्ध आहे. ओडिशाच्या पश्चिमेला छत्तीसगड, उत्तर-पूर्वेला पश्चिम बंगाल, उत्तरेला बिहार आणि झारखंड, दक्षिण-पूर्वेला आंध्रप्रदेश आणि पूर्वेला बंगालची खाडी आहे. ओडिशाची समुद्रसपाटी 480 किलोमीटर लांब आहे. तर राज्याचं क्षेत्रफळ 1,55,707 वर्ग किमी आहे. ओडिशाने देशाच्या एकूण एरियाच्या 4.87% हिस्सा व्यापून टाकला आहे. ओडिशा चार प्रमुख (उत्तर पठार, मध्य नदी खोरे, पूर्व डोंगराळ आणि तटीय मैदान) भौगोलिक क्षेत्रात विभागला गेला आहे. हिंदूंचं पवित्रस्थान असलेलं जनन्नाथ पुरी मंदिर याच परिसरात आहे. ओडिशात लोकसभेच्या 21 जागा आहेत. 2019च्या लोकसभा निडवणुकीत बीजू जनता दलाने 12 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपने 8 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती.
ओडिशा लोकसभा मतदारसंघाची यादी
राज्य | जागा | उमेदवार | वोट | पक्ष | स्टेटस |
---|---|---|---|---|---|
Orissa | Kandhamal | SUKANTA KUMAR PANIGRAHI | - | BJP | Won |
Orissa | Mayurbhanj | NABA CHARAN MAJHI | - | BJP | Won |
Orissa | Balasore | PRATAP CHANDRA SARANGI | - | BJP | Won |
Orissa | Keonjhar | ANANTA NAYAK | - | BJP | Won |
Orissa | Jajpur | RABINDRA NARAYAN BEHERA | - | BJP | Won |
Orissa | Bhadrak | AVIMANYU SETHI | - | BJP | Won |
Orissa | Berhampur | DR PRADEEP KUMAR PANIGRAHY | - | BJP | Won |
Orissa | Jagatsinghpur | BIBHU PRASAD TARAI | - | BJP | Won |
Orissa | Bolangir | SANGEETA KUMARI SINGH DEO | - | BJP | Won |
Orissa | Dhenkanal | RUDRA NARAYAN PANY | - | BJP | Won |
Orissa | Cuttack | BHARTRUHARI MAHTAB | - | BJP | Won |
Orissa | Nabarangpur | BALABHADRA MAJHI | - | BJP | Won |
Orissa | Kalahandi | MALVIKA DEVI | - | BJP | Won |
Orissa | Sundargarh | JUAL ORAM | - | BJP | Won |
Orissa | Bargarh | PRADEEP PUROHIT | - | BJP | Won |
Orissa | Sambalpur | DHARMENDRA PRADHAN | - | BJP | Won |
Orissa | Aska | ANITA SUBHADARSHINI | - | BJP | Won |
Orissa | Koraput | SAPTAGIRI ULAKA | - | INC | Won |
Orissa | Puri | SAMBIT PAATRA | - | BJP | Won |
Orissa | Bhubaneswar | APARAJITA SARANGI | - | BJP | Won |
Orissa | Kendrapara | BAIJAYANT JAI PANDA | - | BJP | Won |
ओडिशा हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले राज्य आहे. ओडिशाला प्राचीन काळी 'कलिंग' म्हणून ओळखले जात होते. हे कलिंग राज्य जिंकल्यानंतर महान सम्राट अशोकाने युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. ओडिशा राज्याच्या ईशान्येला पश्चिम बंगाल, उत्तरेला झारखंड, दक्षिणेला आंध्र प्रदेश आणि पश्चिमेला छत्तीसगड हे राज्य आहे. तर त्याच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. ओडिशा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील आठव्या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने 11वे मोठे राज्य आहे. 1 एप्रिल 1936 रोजी ओडिशा हा स्वतंत्र प्रांत बनला.
पूर्वी त्याला ओरिसा राज्य म्हणत. नंतर, राज्य सरकारने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर, केंद्र सरकारने मार्च 2011 मध्ये राज्याचे नाव बदलून ओडिशा केले. येथील राजधानी भुवनेश्वर आहे. येथील एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्के लोकसंख्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येथे अनेक सुंदर ठिकाणे आहेत. कोणार्क येथील सूर्य मंदिर, भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर, पुरी येथील जगन्नाथ मंदिर आणि पुरी समुद्रकिनारा अतिशय प्रसिद्ध आहे.
नवीन पटनायक सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत आणि ते बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते आहेत. राज्यात 20 वर्षांहून अधिक काळ बिजू जनता दलाची सत्ता आहे. बिजू जनता दलाशिवाय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे येथे प्रमुख पक्ष आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला भाजपचे कडवे आव्हान आहे. पुन्हा एकदा येथे लोकसभा निवडणूक होत असून यावेळी बिजू जनता दल आणि भाजप यांच्यात कडवी लढत होण्याची शक्यता आहे.
प्रश्न - ओडिशातील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी किती होती?
उत्तर – 73.29% मते
प्रश्न - ओडिशामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत?
उत्तर - 21
प्रश्न - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओडिशात कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या?
उत्तर - बिजू जनता दल
प्रश्न - 2019 च्या निवडणुकीत बिजू जनता दलाने किती जागा जिंकल्या?
उत्तरः 12 जागा जिंकल्या.
प्रश्न - ओडिशातील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?
उत्तर – 8
प्रश्न - 2014 च्या तुलनेत 2019 च्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे सर्वाधिक नुकसान झाले?
उत्तर - बिजू जनता दल. 2014 मध्ये 20 जागा जिंकल्या होत्या तर 2019 मध्ये 12 जागा जिंकल्या होत्या.
प्रश्न - 2014 च्या निवडणुकीत भाजपला ओडिशात किती जागा मिळाल्या होत्या?
उत्तरः फक्त एक जागा जिंकली.
प्रश्न – 2019 मध्ये ओडिशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला किती जागा मिळाल्या?
उत्तर - 1
प्रश्न - 2019 च्या निवडणुकीत बिजू जनता दलाला ओडिशात किती टक्के मते मिळाली?
उत्तर - 42.8%.
प्रश्न - 2019 मध्ये भाजप नेते संबित पात्रा यांचा कोणत्या जागेवरून पराभव झाला?
उत्तर - पुरी लोकसभा जागा
प्रश्न - ओडिशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या किती जागा आरक्षित आहेत?
उत्तर - लोकसभेच्या 8 जागा राखीव आहेत.